आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका सेल्फीमुळे इंटरनेटवर फेमस झाली ही मुलगी, अनेकांना करायचे आहे तिच्‍याशी लग्‍न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - रईस सिनेमाच्‍या प्रमोशनसाठी शाहरुख खान नुकताच पुण्‍यातील सिम्‍बॉयसिस कॉलेजला गेला होता. तेथे आपल्‍या फॅन्‍ससोबत शाहरुखने एक सेल्फी काढला आणि तो सोशल मिडीयावर पोस्‍ट केला. या पोस्‍टमुळे त्‍याच्‍या रईस सिनेमाचे किती प्रमोशन झाले हे माहित नाही, मात्र यामुळे सिम्‍बॉसिस कॉलेजमधील एक मुलगी फार फेमस झाली आहे. पोस्‍टवरील कमेन्‍ट्समध्‍ये युझर्स या मुलीबद्दलच जास्‍त चर्चा करीत आहे. 
 
कोण आहे ही मिस्‍ट्री गर्ल?
- शाहरुखच्‍या सेल्फिमधील मिस्‍ट्री गर्ल 21 वर्षांची सायमा हुसैन आहे. ती सिम्‍बॉयसिस कॉलेजमध्‍ये डिझायनिंग शिकत आहे. 
- सायमा मुळची काश्मिरची राजधानी श्रीनगरची रहिवासी आहे. ती सध्‍या थर्ड ईयरमध्‍ये शिकत आहे. 
- शाहरुखच्‍या फेसबुकपोस्‍टला कमेन्‍ट करताना अनेकांनी तिला लग्‍नाची ऑफर दिली आहे.
 
बेस्‍टफ्रेंडने सांगितले पोस्‍टबद्दल, त्‍यानंतर येत आहेत कॉल्स आणि मेसेज 
- सायमाने सांगितले की, 'मला माझ्या बेस्‍टफ्रेंडने सांगितले की, मी इंटरनेटवर फेमस झाली आहे.' 
- 'पहिले माझा तिच्‍या बोलण्‍यावर विश्‍वासच बसला नाही. मात्र नंतर मला अनेक फोन आणि मेसेज येऊ लागले.' 
- सायमाने सांगितले की, 'अनेकजण माझ्याशी बोलण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. त्‍यांना कसे डील करावे, हे मला समेजेनासे झाले आहे.' 
- 'अशाप्रकारचा आपला पहिलाच अनुभव असून यामुळे मी आनंदी आहेे', असे सायमाने सांगितले.  
 
अशी आली शाहरुखच्‍या सेल्फिमध्‍ये 
- शाहरुख सिम्‍बॉयसिस कॉलेजमध्‍ये एका पदव्‍युत्‍तर समारंभासाठी गेला होता. 
- शाहरुखला पाहण्‍यासाठी कॉलेजमध्‍ये फार गर्दी झाली होती. 
- आपल्‍या एका मित्राच्‍या मदतीने सायमा गर्दीत शिरली. 
- सायमाने सांगितले की, 'मी लकी आहे की, गर्दीत मला सर्वांच्‍या समोर जागा मिळाली. त्‍यामुळेच मी सेल्फीत येऊ शकले.'
 
पुढील स्‍लाईड्सवर सायमा आणि इव्‍हेंटचे Photos...
 
बातम्या आणखी आहेत...