आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानकडून चूक घडली पण त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी- चाहत्यांची अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान हिट अँड रन प्रकरणाच्या खटल्यात दोषी आढळला आहे. या प्रकरणात सलमान दोषी ठरल्याने त्याला किती वर्षांच्या कैदेची शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा खटला तब्बल 13 वर्षे चालला आहे. या निकालामुळे सलमानच्या कारकीर्दीचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.
सलमान खानकडून जरूर चूक घडली आहे मात्र त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी अपेक्षा चाहते व्यक्त करीत आहेत. सलमान एक हळवा, संवेदनशील व्यक्ती आहे. त्याने हजारो लोकांना मदत केली आहे. रूग्ण, गरीबांना मदत करून आपण समाजाचे देणे लागतो हे सामाजिक भान राखले आहे. आज सलमान खानच्या हिट अॅंड रन प्रकरणाच्या खटल्याचा निकाल येणार असला तरी सलमान खानच्या संस्थेचे सामाजिक कार्य आजही सुरु आहे. सलमान खानच्या वांद्रेतील घराजवळील आजही कॅन्सरचे रूग्ण तपासणीसाठी सकाळपासून रांगेत उभे राहिले आहेत. या ठिकाणी सलमान खानने स्वत: कॅन्सरचे तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. यासाठी त्याने कोट्यावधी रूपये आतापर्यंत खर्च केले आहेत. आजच्या खटल्याच्या निकालाच्या दिवशीही 100 ते 150 रूग्णांनी सलमान खानच्या संस्थेमार्फत होत असलेल्या मोफत उपचारासाठी हजेरी लावली आहे.
यात सहभागी झालेल्या रूग्णांनीही सलमान खानबाबत आपुलकी व्यक्त केली. सलमान खानकडून चूक घडली असली तरी त्याला माफ केले पाहिजे. त्याने यात जाणून-बुझून कोणतेही कृत्य केले नाही. तो एक अपघात होता. सलमानने आतापर्यंत मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेले कार्य पाहता त्याला माफ केले पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सलमान खानच्या शिक्षेबाबत सोशल मिडियातूनही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सलमान या प्रकरणात दोषी आढळेल पण त्याला तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा होईल व त्याला लागलीच जामिनही मंजूर होईल अशी आशा त्याच्या चाहत्यांनी टि्वटरवर व्यक्त केली आहे.
पुढे आपण पाहूया सोशल मिडियात सलमान खानबाबत व्यक्त झालेल्या संमिश्र प्रतिक्रिया...
@shankyshekhar02
We hope nd prays well for #salman Khan
@Cp_msd_salman
...ek choti si gatna ko itna tual ku har roj rape murder hote h unka to kuch nho or jo desh ko aage bada ra h
@ImKrish35
:) God save him Don't know what inspiration he got ?? #Salman Khan is an inspiration to us. He is a motivation to us:
@patelgaurav50
ye jaisa bhi samay h , m wid u salman khan !!!
i wish court ka decision aapke favour me jaye !!!
@GershomHeadhunt
poor guy normally wakes up past noon, had to get up early today.
@kratika91
A lion runs the fastest when he is hungry.
@tideiril
I don't feel sorry for the producers whose Rs.200 Cr are riding on #Salman Khan. They knew about this case in advance & they took that risk
@Harshada0327
Today is the Big Day...We fans are always with him !!
Praying for Salman Khan...
@prakashraaj
Since I have met that harmless child n loads of goodness in him ..Wish n pray world considers that n pays him back for that too.