आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऐ दिल..’वाद मिटल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, म्हणाले -1 MLA पार्टी पडली भारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सोशल मिडीयावर भराभरा प्रतिक्रिया यायला लागल्या. राज ठाकरे लगेचच ट्रेंड करू लागले. काही युजर म्हणाले की, १ आमदार असलेल्या पक्षाने कोणत्याही सपोर्टशिवाय करणला "मुश्कील"मध्ये टाकले. तर काहींनी राज ठाकरे यांचा स्टँड अगदी बरोबर होता असे लिहिले आहे. शहीदांच्या खांद्यावरही बंदूक...

- @Sharanyashettyy या अकाऊंटवर ट्वीट करण्यात आले आहे की, राज ठाकरे शहीदांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत. यामध्ये गर्व करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही.
- @iamranjandhar ने लिहिले आहे, जेव्हा आमची आर्मी दररोज एलओसीवर दहशतवाद्यांसोबत लढते, तेव्हा आपण कमीत कमी त्या वेळीतरी त्यांच्या हक्कासाठी एकत्र यायला हवे आणि राज ठाकरेंनी तेच केले आहे.
- @tehseenp - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे सारख्या ठग माणसासोबत बोलून हे प्रकरण का मिटवले. फडणवीस यांनी राज ठाकरेला जेल मध्ये टाकायला हवे.

जोक्सही शेअर झाले..
- @pr_akash_raj याने जोक शेअर केल आहे.
"राज ठाकरे ने बेटे से पूछा- कौनसा गाना सुन रहे हो?
बेटे ने कहा- दूरी....।
राज ठाकरे ने कहा- ठीक है, आज से तुम्हारी पॉकेट मनी 50 रुपए कम कर दी जाएगी।
- @hankypanty ने ट्वीट केले आहे, राज ठाकरेने "ऐ दिल ..." च्या प्रदर्शनाला मंजूरी दिली. मात्र शर्त ठेवली की, पाच कोटी रुपये आर्मी रिलिफ फंडाला द्यावे लागतील. ही तर हप्ता वसूली आहे.
- काही लोकांनी सरकारी वसूली सांगत देवेंद्र फडणवीसांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. सोबतच महाराष्ट्र सरकारची जबाबदारी तर कायद्याची अंमलबजावणी करण्याची आहे.

बाळा साहेबांच्या मार्गावर राज
- ‘ऐ दिल....’ वर कडक पाऊड उडलणारे मनसे अध्यक्ष यांची प्रशंसा केली जात आहे. एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, राज बाळासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. त्यांनी देश आणि देशाच्या जवानांसाठी चांगले काम केले आहे.
- महेश नावाच्या एका युजरने लिहिले आहे - राज ठाकरेने पुन्हा आम्हाला मुर्ख बनवले आहे. हे पाच करोड आर्मीला नाही तर राज यांच्यापक्षाला मिळतील. सत्य तर हेच आहे की, आम्हाला राजकारण समजत नाही.
काय होता वाद
- करण जोहर निर्मित 'ऐ दिल...' मध्ये पाक कलाकार फवाद खान आणि इमरान अब्बास नकवी यांनी काम केले आहे. उरी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत पाक कलाकारांना भारतात काम देण्यामुळे वाद झाला होता.
- यामध्ये मनसेने चित्रपटाचा विरोध केला आहे. सिनेमा ओनर्स एक्सिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COEAI) सांगितले होते की, 4 राज्यात सिंगल स्क्रीनवर हा चित्रपट नाही दाखवला जाणार..
- "ए दिल..." हा चित्रपट 28 ऑक्टोबरला रिलिज होणार आहे. वाद वाढताना दिसत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण आणि राज यांच्यामध्ये समझौता घडवून आणला.
राज यांच्या या अटी केल्या मान्य..
- राज यांनी विरोध मागे घेण्यासाठी तीन अटी ठेवल्या होत्या. यामध्ये पहली अट - 'ऐ दिल...' च्या सुरुवातीला शहिदांच्या सन्मानार्थ एक संदेश दाखवला जाईल. दुसरी अट - यापुढे प्रोड्यूसर्सने कोणत्याही पाक कलाकारासोबत काम करू नये. आणि तिसरी अट- ज्या चित्रपटांमध्ये पाक कलाकार आहेत, त्यांनी आर्मी रिलिफ फंडाला प्रायश्चित्त म्हणून 5 कोटी रुपये जमा करावेत.
बातम्या आणखी आहेत...