आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर नारायण राणे यांच्या पराभवाची उडवली जातेय खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉंग्रेस नेते नारायण राणे वांद्रे पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकीटावर उभे होते. वांद्रे म्हणजे शिवसेनेचा गड. सेनेच्या गडातच सेनेला आव्हान देण्याचे धारिष्ट्य राणेंनी दाखवले. पण शेवट पराभवात झालाय. या मतदारसंघात एमआयएम तिसरा मोठा पक्ष राहिला. कॉंग्रेस आणि एमआयएमची मते एकत्र केली तरी शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांचा पराभव होणार नाही एवढी मतं त्यांना पडली आहेत.
दरम्यान, नारायण राणे यांच्या संभाव्य पराभवाची सोशल मीडियात जोरदार खिल्ली उडवली जात आहे. कुणी त्यांना पाकिस्तानचे तिकीट दिली आहे, तर कुणी नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला आहे. कुणी शिवसेनेच्या वाघाची प्रशंसा केली आहे तर कुणी नारायण राणेंवर जोरदार प्रहार केला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, सोशल मीडियावर कोणी काय ट्विट केली... हसून हसून दुखेल पोट...