आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Welfare Minister Dilip Kamble Aggressive In Vidhan Parishad

मंत्र्यांची पंडितांना धमकी, एकनाथ खडसेंची दिलगिरी; सहा वेळा परिषद तहकूब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सामाजिक न्याय राज्यमंत्री िदलीप कांबळे यांनी प्रश्न विचारणाऱ्या िवरोधी बाकावरील सदस्यास थेट धमकीची भाषा वापरल्याने िवधान परिषदेत गुरुवारी मोठा गोंधळ उडाला. विराेधकांच्या गाेंधळामुळे कामकाज सहा वेळा तहकूब झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकजूट दाखवत कामकाज रोखून धरल्याने सभागृहाचे नेते एकनाथ खडसे यांना अशी भाषा सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा वापरली जाणार नाही, अशी दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की फडणवीस सरकारवर ओढवली.

राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी तारांकित प्रश्न विचारला. गेवराई तालुक्यातील रेवकी गावच्या खंडूबाबा माध्यमिक िवद्यालयातील िशष्यवृत्ती वाटपातील गैरव्यवहाराच्या संदर्भातील हा प्रश्न होता. सामाजिक न्याय राज्यमंत्री िदलीप कांबळे त्याला उत्तर देत होते.
‘या प्रकरणी अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असून गुन्हा केव्हा नोंद करणार?’ असे पंडित म्हणाले. त्यावर कांबळे यांनी ‘चांगल्या शाळा बंद पाडण्यासाठी चौकशा लावण्याचे प्रकार खपवून घेणार नाही’, असा इशारा देत पंडित यांना धमकी दिली. त्यावर राष्ट्रवादीचे जयवंतराव जाधव, सतीश चव्हाण, िवक्रम काळे, नरेंद्र पाटील, िनरंजन डावखरे, पंडित आदी सदस्यांनी कांबळेंच्या आसनाकडे धाव घेतली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सभागृहात नव्हते. ते तातडीने धावत आले व सदस्यांना शांत केले. गोंधळ सुरू असताना सभापतींनी सभागृह दहा िमनिटांसाठी तहकूब केले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापतींनी काँग्रेसचे िशवाजीराव देशमुख यांना भावना व्यक्त करण्याची संधी िदली. ‘संबंधीत मंत्र्यांनी नव्हे तर सभागृह नेत्यांनी माफी मागावी’, अशी मागणी त्यांनी केली. सभागृह नेते एकनाथ खडसे सभागृहात नव्हते. तोपर्यंत म्हणजे सायंकाळी चारपर्यंत सभागृह तहकूब ठेवण्यात आले. खडसे यांनी िदलगिरी व्यक्त केल्यानंतर विरोधी सदस्य शांत झाले अाणि सभागृहाचे कामकाज सुरुळीत सुरू झाले.

कामकाजात सहभाग कमीच घ्यावा : देशमुख
कामकाजात कमीत कमी भाग घ्यावा, असं आता माझं मत झालंय. ट्रेेझरी बेंचकडून िवरोधकांवर असे आघात हाेणे गंभीर बाब आहे. सभागृहात मंत्र्यांइतकाच सदस्यांचा हक्क असतो. राज्यमंत्र्यांच्या इथे मर्यादा सुटलेल्या िदसतात. धमकीची जबाबदारी एकट्या मंत्र्यांची नसून संपूर्ण मंत्रिमंडळाची आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनी िदलगिरी व्यक्त करावी, असे मत माजी सभापती िशवाजीराव देशमुख यांनी व्यक्त केले.
कोण काय म्हणाले?
माझ्या िवधिमंडळाच्या २० वर्षाच्या काळात मी असा प्रकार कधी पाहिला नाही. झाला प्रकार लाजिरवाणा आहे. मंत्र्यांचे सदर शब्द सदस्यांची मागणी होण्यापूर्वी कामकाजातून काढून टाकत आहे.
सभापती, रामराजे नाईक - निंबाळकर.

दोन्ही बाजूकडील सदस्यांनी संयम बाळगावा. भावनेच्या आहारी जाऊन उद्वेगाची भाषा सत्ताधारी बाकांवरील सदस्यांना न वापरण्याची मी सूचना देतो. याबाबत मी िदलगिरी व्यक्त करतो.
एकनाथ खडसे, सभागृह नेते
याप्रकरणी कठोर कारवाई झाली नाही तर सत्ताधारी पुढेही अशीच धमकीची भाषा वापरतील. त्यामुळे सभागृह नेत्यांनी माफी मागेपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही.
- धनंजय मुंडे, विराेधी पक्षनेते.