आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजसेविका अनितामाई धर्माधिकारी यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिबाग - ज्येष्ठ निरूपणकार डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी व श्री संप्रदायाच्या अाधारस्तंभ अनितामाई (६३) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील हरेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती डाॅ. अप्पासाहेब, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

अनिता धर्माधिकारी यांचा १९७४ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी अप्पासाहेबांसोबत स्वत:ला समाजप्रबोधनाच्या कार्यात वाहून घेतले. व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर यांसारख्या उपक्रमांत त्यांचे श्री संप्रदायाला मोलाचे मार्गदर्शन मिळत असे. माईंचे निधन झाल्याची बातमी कळताच हजाराे सदस्यांनी मिळेल त्या वाहनाने रेवदंड्याकडे धाव घेतली. दुपारी १२.३० वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात अाली. यात हजाराे श्री सदस्य सहभागी झाले हाेते. हरेश्वर स्मशानभूमीत माईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.