आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Software Engineer From Thane In Coma After Fall From Speedy Auto

आणखी एक लाजीरवाणी घटना घडणारच होती; तिने उडी ठोकली पण कोमात गेली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: स्वप्नाली लाड)
मुंबई- मागील दोन-तीन वर्षापासून महिला व तरूणी किती असुरक्षित आहेत याची आपण मुंबईसह देशभर उदाहरणे पाहिली. सरकारने कडक कायदे केले तरी त्याला म्हणावा तसा आळा बसत नाहीये हे वारंवार घटनांवरून सिद्ध होत आहे. शनिवारी ठाण्यातही असाच प्रसंग एका 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या स्वप्नाली लाड हिच्यावर प्रसंग ओढावला होता. मात्र, तिच्या चाणाक्ष बुद्धीने व नजरेने अचूक जाणले व आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करताना तिने आपल्या जीवाचा विचार केला नाही. चालत्या रिक्षातून तिने उडी मारली खरी पण ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या ती कोमात असून ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली लाड ही टीसीएसमध्ये आयटी इंजिनीअर असलेली तरूणी शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास ऑफिसवरून रात्री घरी येत होती. त्यावेळी तिने कापुरवाडी नाक्यावर तिच्या घराच्या दिशेने म्हणजे कोलशेत मार्गाकडे जाणा-या रिक्षाला हात केला. रिक्षात बसल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर कोलशेतच्या दिशेने रिक्षा न नेता रिक्षाचालकाने भिवंडीच्या दिशेने रिक्षा वळविली. भिवंडीच्या रोडने कशाला रिक्षा नेत आहे असे विचारला त्याने काहीही उत्तर दिले नाही. उलट रिक्षा वेगाने चालवायला सुरुवात केली. रात्रीच्या वेळ असल्यामुळे स्वप्नाली घाबरली व तिने थेट चालत्या रिक्षातून उडी मारून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वप्नाली डोक्यावर आदळली. त्यामुळे स्वप्नाली त्याच जागेवर बेशुद्ध पडली. तिच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले.
काही वेळानंतर बघ्यांची गर्दी झाली. मात्र, तिला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी तयार नव्हते. त्याचवेळी स्थानिक नगरसेविका उषा भोईर या कारने आपल्या घराकडे जात होत्या. स्थानिक असल्याने काही भांडण वगैरे झाले आहे अशी विचारपूस करावी म्हणून त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितले. भोईर पुढे जाऊन पाहतात तर स्वप्नाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिला कोणीही दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचे पाहून उषा भोईर यांनी ड्रायव्हरला सांगून तिला प्रथम दवाखान्यात दाखल केले.
सध्या स्वप्नाली कोमात आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तोपर्यंत ती कोमातून बाहेर येत नाही तोपर्यंत त्या रिक्षाचालकाबाबत माहिती मिळणे अवघड आहे. स्वप्नाली चालत्या रिक्षातून उडी मारल्यानंतर तेथून रिक्षाचालक फरार झाला होता. पोलिसांनी काही खब-यामार्फत चौकशी सुरु केली आहे मात्र अद्याप यश आले नाही. पोलिस आता स्वप्नाली कोमातून बाहेर येण्याची व त्यातून तिला बरे वाटण्याची वाट पाहत आहेत. मात्र, चाणाक्ष बुद्धीच्या स्वप्नाली लाडने उडी मारून आपली सुटका करून घेतली तरी हीच उडी तिच्या जीवावर बेतली आहे. दरम्यान, या घटनेने या राज्यात व देशात महिला व तरूणी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.