आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Software Engineer Girl Come Out From Coma After 21 Days Who Is Fall From Speedy Auto

डॉक्टरांच्या 21 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर स्वप्नाली लाड अखेर कोमातून बाहेर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: स्वप्नाली लाड)
मुंबई- 1 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास कामावरून घरी रिक्षातून जात रिक्षाचालक चुकीच्या मार्गाने नेत असल्याचे लक्षात येताच धावत्या रिक्षातून उडी मारल्याने कोमात गेलेली स्वप्नाली लाड अखेर कोमातून बाहेर आली आहे. अपहरणाच्या भीतीने स्वत:चा बचाव करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या स्वप्नालीने रिक्षातून उडी मारली खरी पण ती उडीच तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. मात्र, ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयातील डॉक्टरांनी सलग 21 दिवस अथक मेहनत घेतली. अखेर स्वप्नाली स्वप्नाली कोमातून बाहेर आली असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
स्वप्नालीवर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली कोमातून बाहेर आली आहे. ती आता हालचाल करू लागली आहे. तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वप्नालीचे आता व्हेंटिलेटर काढून टाकले आहे. तसेच तिला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. मात्र, अजून तिची स्मरणशक्ती परत आलेली नाही. आसपासच्या व्यक्तींना ती अजून ओळखत नाही. मात्र हळूहळू ती नॉर्मल होऊ शकते.
24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली स्वप्नाली लाड टीसीएसमध्ये नोकरीला आहे. 1 ऑगस्टला रात्री 9 च्या सुमारास ऑफिसवरून रात्री घरी येत होती. त्यावेळी तिने कापुरवाडी नाक्यावर तिच्या घराच्या दिशेने म्हणजे कोलशेत मार्गाकडे जाणा-या रिक्षाला हात केला. रिक्षात बसल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर कोलशेतच्या दिशेने रिक्षा न नेता रिक्षाचालकाने भिवंडीच्या दिशेने रिक्षा वळविली. भिवंडीच्या रोडने कशाला रिक्षा नेत आहे असे विचारला त्याने काहीही उत्तर दिले नाही. उलट रिक्षा वेगाने चालवायला सुरुवात केली. रात्रीच्या वेळ असल्यामुळे स्वप्नाली घाबरली व तिने थेट चालत्या रिक्षातून उडी मारून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, स्वप्नाली डोक्यावर आदळली. त्यामुळे नाका-तोंडातून रक्त येऊ लागल्यानंतर स्वप्नाली त्याच जागेवर बेशुद्ध पडली व कोमात गेली होती. त्याचवेळी स्थानिक नगरसेविका उषा भोईर या कारने आपल्या घराकडे जात होत्या. त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितले. भोईर पुढे जाऊन पाहतात तर स्वप्नाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिला कोणीही दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचे पाहून उषा भोईर यांनी ड्रायव्हरला सांगून तिला प्रथम दवाखान्यात दाखल केले होते. गेली 21 दिवस स्वप्नाली कोमात होती मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न केल्याने अखेर ती कोमातून बाहेर आली आहे.
दरम्यान, ठाणे पोलिसांनी त्या रिक्षाचालकाची मागील 20 दिवसापासून चौकशी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. स्वप्नाली कोमात असल्याने संबंधित रिक्षाचालकाबाबत कोणताही क्ल्यू मिळत नव्हता. आता स्वप्नाली कोमातून बाहेर आल्याने तो रिक्षाचालक कोण होता व त्यादिवशी नेमकं काय झाले होते याचे गूढ उकलण्याचा पोलिस प्रयत्न करतील.