आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण: नाही नाही म्हणत गणपतराव राजी, तेराव्या वेळी विधानसभा लढविण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यविधिमंडळात आपल्या कारकीर्दीचे अर्धशतक पूर्ण केलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यंदाही सांगोला मतदारसंघातून आगामी विधानसभा लढवण्यास राजी झाले आहेत. पक्षाकडून त्यांची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
सांगोला (जि. सोलापूर) विधानसभा मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांनी सलग १२ वेळा निवडणूक लढवली. १९७७ आणि १९९५ या दोन नविडणुकांचा अपवाद वगळता तब्बल १० वेळा ते विजयी झालेले आहेत. देशमुख यांचे वय ८७ झाले आहे. प्रकृती साथ देत नसल्याने या वेळी आपण नविडण्ूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते.
आपल्या जागी उद्योगपती भाऊसाहेब रूपनर (पुणे) यांना पक्षाने तिकीट द्यावे, असा गणपतराव यांनी पक्षाकडे आग्रह धरला होता. मात्र, गणपतराव नविडणुकीच्या रिंगणात नसल्यास सांगोल्याच्या हुकमी जागेवर पाणी सोडावे लागेल, अशी भीती पक्षनेतृत्वाला आहे. त्यामुळे शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील (जि. रायगड) गेला आठवडाभर देशमुख यांची मनधरणी करत होते. शेकापने तिसऱ्या आघाडीची नुकतीच घोषणा केली. तसेच आघाडीच्या १४ उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. मात्र, त्यामध्ये सांगोला मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे गणपराव या वेळी निवडणूक रिंगणात नसणार असा सर्वांचा अंदाज झाला होता.
शरद पवारांची मदत
सांगोला मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्यास आलेला आहे. गणपतराव शेकापचे आमदार असले तरी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे ते अत्यंत जवळचे समजले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीने कायमच गणपतराव यांना मदत केलेली आहे. गणपतराव यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शहाजीबापू पाटील या वेळी शिवसेनेकडून निवडणूक लढणार आहेत, तर काँग्रेस पक्ष लिंगायत समाजातील प्रबुद्धचंद्र झपके यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. गणपतराव दहा वेळा विजयी होत आले असले तरी त्यांचे मताधिक्य प्रत्येकवेळी घटत आलेले आहे.