आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Drugs Case, Underworld, Politician & Officer Involvement

2 हजार कोटींच्या सोलापूर ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड, राजकारण्यांसह अधिकारी सामील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पकडलेला ड्रग्ज साठा सादर करताना... - Divya Marathi
ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पकडलेला ड्रग्ज साठा सादर करताना...
मुंबई- सोलापूरात काही दिवसापूर्वी सापडलेल्या 2 हजार कोटींच्या ड्रग्जप्रकरणी नवे नवे खुलासे होत आहेत. पोलिस तपासात पुढे येऊ लागले आहे की, या प्रकरणात अंडरवर्ल्ड, राजकीय नेत्यांच्या जवळचे लोक एवढेच नव्हे तर सरकारी अधिकारीही यात गुंतले आहेत. याप्रकरणी पुनीत श्रृंगी, किशोर राठोड आणि जयमुख नाम हे तिघे मुख सूत्रधार आहेत.तीन प्रमुख सूत्रधारांची ओळख पटल्यानंतर त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस बजावली जाणार आहेत.
30 वेळा परदेशी वारी-
ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या माहितीनुसार, किशोर राठोड हा गुजरातमधील माजी काँग्रेस आमदाराचा मुलगा आहे. पुनीत आणि किशोरने एका वर्षात 30 वेळा एकत्र परदेश वारी केली आहे. ये दोघे नायजेरिया, पोलंड आणि इतर काही अफ्रिकन देशात गेले होते. या प्रकरणाचा मास्टरमाईंड पुनीत श्रृंगी आहे. महागडी लाईफस्टाईल, मुलींवर पैसे उडविणे याचा छंद असल्याने हे तिघे एकत्र आले व नंतर ड्रग्ज व्यवसायात गुंतल्याचे समोर आले आहे. हे तिघे परदेशात पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना रेड कॉर्नर नोटिस बजावण्यात आल्याचे कळते.
एव्हॉनमधील कामगारांचे घेतले जबाब-
अहमदाबादयेथील रिया इंडस्ट्रीजमध्ये सापडलेल्या अमली पदार्थांच्या साठा प्रकरणातील मुख्य संशयित असलेला पुनीत सोलापुरात यायचा का? त्याचा सोलापुरातील एव्हॉन ऑरगॅनिक्सची काही संबंध आहे का? याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न गुजरात, ठाणे, सोलापूर येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने एव्हॉन ऑरगॅनिक्सच्या कामगारांकडे केला. पथकाने एव्हॉन ऑरगॅनिक्सच्या कामगारांचे जबाब नोंदवले.
मुख्य सूत्रधार सोलापूरातील-
सोलापूरातील चिंचोळी औद्योगिक वसाहतीतील एव्हॉन ऑरगॅनिक्समधून शनिवारी 18 हजार किलो इफेड्रीन जप्त करण्यात आले होते. अन्न औषध प्रशासनाने कंपनीची सर्व व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आज ही तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अहमदाबाद (गुजरात) येथील रिया इंडस्ट्रीजमध्ये 15 एप्रिल रोजी छापा टाकून 272 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी किशोर राठोड आणि पुनीत यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पुनीत मूळचा सोलापूरचा असल्याची माहिती गुजरात एटीसएसला मिळाली होती. यानंतर ठाणे येथेही अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणात पुनीत मुख्य संशयित आहे, मात्र ठाणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. एव्हॉन ऑरगॅनिक्समधील छाप्याप्रकरणीही पुनीतवर गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र गुजरात एटीएस, ठाणे पोलिस आणि अमली पदार्थविरोधी पथक त्याच्याबद्दल सखोल चौकशी करीत आहे. पुनीतचे पूर्ण नावही पोलिसांनी जाहीर केलेले नाही. त्यामुळे पुनीत नेमका कोण आहे? तो नेमका कुठे राहतो? त्याचा या संपूर्ण प्रकरणात हा अपराध आहे याबद्दल चर्चा सुरू आहे.
उत्पादन, पुरवठ्यांची तपासणी-
एव्हॉन कंपनीने आतापर्यंत कोणाला, कोठे माल पुरवठा केला, कच्चा माल कोठून खरेदी केला, याशिवाय कंपनी प्रशासनाकडून परवानगीशिवाय इतर काही उत्पादन केले आहे काय? याचीही चौकशी केली जात आहे.
पुढे पाहा, स्लाईडद्वारे या प्रकरणाची व्याप्ती...