आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 28 व्या वर्षी बनल्या आमदार; प्रणिती शिंदेंनी घेतला होता ओवेसींसोबत पंगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/सोलापूर- माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला आमदार आहेत. आज (9 डिसेंबर) प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस. त्‍या अनुषंगाने आम्ही आपल्या त्‍यांच्‍याविषयी खास माहिती घेऊन आलो आहे.

दांडगा जनसंपर्क, धाडसी आणि मनमिळावू स्‍वभाव, प्रभावी वत्कृत्‍वकला, या गुणांमुळे प्रणिती यांनी आपल्‍या वडिलांप्रमाणेच अत्‍यंत अल्प कालावधीत स्‍वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून त्‍यांची राज्यात ओळख आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरमधून त्या निवडून आल्या. परंतु, त्यानंतर 'एमआयएम' या पक्षाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने प्रचंड वाद झाला होता.

प्रणिती यांनी 2001 मध्ये मुंबईच्या सेंट झेव्हिअर कॉलेजमधून कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर 2004 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांंनी एलएलबीची पदवी मिळवली.

'जाई जुई विचार मंच' माध्‍यमातून सामाजिक कार्य
प्रणिती शिंदे यांनी 'जाई जुई विचार मंच' या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून भरीव काम केले आहे. कला आणि संस्कृती, बालके, पायाभुत सुविधा, दलितांचा विकास, शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कामगार आणि रोजगार, अल्प आर्थिक सहकार्य आदी विषयांवर या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते.

ओवेसींसोबत घेतला होता पंगा...
वर्ष 2014 मध्‍ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या सोलापूरमध्ये मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या. या निवडणुकीत अल्प मतांनी विजयी झाल्याने त्यांनी याचे खापर आयआयएम या पक्षावर फोडले होते. हा पक्ष राष्ट्रविरोधी असून, त्याच्यावर आणि त्याच्या नेत्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर यावर बराच वाद झाला होता. आयआयएम पक्षाने प्रणिती शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याची नोटीस बजावली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... महाराष्‍ट्रातील सर्वात तरूण आमदार प्रणिती शिंदे यांचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...