आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजांची पाठ, बाळासाहेब-मुंडेचे स्मरण अन् सेल्फीही, असा रंगला शपथविधी सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी मंत्री एकनाथ खडसे व मंत्रिपदाने हुलकावणी दिलेले नाराज अामदार विनायक मेटे यांनी मंत्रिमंडळ विस्तार साेहळ्याकडे पाठ फिरवली, तर विदेश दाैऱ्यावर असल्यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या साेहळ्याला उपस्थित राहू शकल्या नसल्याचे सांगण्यात अाले.

विनायक मेटे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये यासाठी पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली हाेती, त्यात त्यांना यश अाल्याची चर्चा शपथविधी साेहळ्यानंतर राजकीय क्षेत्रात हाेती. भ्रष्टाचाराच्या अाराेपामुळे मंत्रिपद साेडावे लागलेले खडसे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते. ते विस्ताराला हजर राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र जळगाव जिल्ह्यातील त्यांचे कट्टर विरोधक गुलाबराव पाटलांना मंत्री केले जात असताना आणि त्यांच्या समर्थकांना संधी मिळत नसल्याने खडसेंनीही साेहळ्यास गैरहजर राहून नाराजी दाखवून दिली. शपथविधी सुरू असताना मेटे हे विधान भवनापासून जवळच असलेल्या मॅजेस्टिक आमदार निवासात बसून होते. ते विधान परिषदेच्या कामकाजातही सहभागी झाले नाहीत. खरे तर परिषदेवर नव्याने निवडून अाल्यानंतर त्यांना अाज सदस्यत्वाची शपथ घ्यायची हाेती. मात्र मेटेेंनी तिकडेही न जाणे पसंत केले.
बाळासाहेब, मुंडेंचे स्मरण
शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खाेतकर आणि गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले, तर भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतले. तसेच खोतकर, जानकर व सदाभाऊ खोत यांनी शपथ घेताना काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांनाही अभिवादन केले. जानकर यांनी शपथ घेताना मी ‘महादेव सोनाबाई-जगन्नाथ जानकर’ असे नाव घेत आपल्या आईलाही प्रणाम केला. खोत यांनी शपथेनंतर ‘जय जवान जय किसान’ घोषणाही दिली.
पुढे वाचा, शपथविधी सोहळ्यातील रंजक बाबी..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...