आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजच्या कटकटीमुळेच मुलाने केली आईची हत्या, पोलिस निरीक्षक गणोरेंचा मुलाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ जोधपूर - खार पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांची पत्नी दीपाली यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेला त्यांचा मुलगा सिद्धांत गणोरे याला पोलिसांनी जोधपूर येथे गुरुवारी अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आई-वडिलांचे भांडण आणि आईची रोजची कटकट यामुळेच तिचा खून केल्याची कबुली दिली.
 
सिद्धांतने सांगितले, ‘आमच्या घरात रोजच वाद होत होते. काही दिवसांपासून वादाचे प्रमाण प्रचंड वाढले होते. मंगळवारी आईने मला महाविद्यालयातील प्रगतिपुस्तक मागितले. त्यावरून आमच्यात वाद झाला. हे सर्व काही सहन करण्याच्या पलीकडे गेले होते. त्यामुळेच आपण आईची हत्या केली.’ हे सर्व सांगताना त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता.
 
सिद्धांत अभ्यासात खूपच हुशार हाेता. दहावीपर्यंत त्याचे हाॅस्टेलमध्येच शिक्षण झाले हाेते. या काळात त्याची अाई विधि अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी लंडनमध्ये हाेती. नंतर घरी परतल्यानंतरही अाई- वडिलांशी त्याचा चांगला संवाद नव्हता.
 
अाई नेहमी अभ्यासासाठी तगादा लावायची. इंजिनिअरिंगही बळजरीने करायला लावले, मात्र त्यात सिद्धांत नापास झाला हाेता. अाता बी.एस्सी.ला अॅडमिशन घेतले हाेते. अाई राेजच त्याला अभ्यासाबाबत विचारायची. अाई- वडिल दाेघेही बाहेर फिरतात अापल्यावर मात्र नाहक निर्बंध टाकले अाहेत. याचा राग सिद्धांतच्या मनामध्ये हाेता.
 
मंगळवारी रात्री अाठ वाजता त्याची अाई बाहेरुन अाली सिद्धांतकडे बी.एस्सीचे मार्कशीट दाखविण्यासाठी अाग्रह धरु लागली. मुळात सिद्धांतने परीक्षाच दिली नव्हती. याच वादातून ताे खाेलीत गेला हातावर चाकूने वार करुन घेतले. तसेच अाईजवळ येऊन त्याने तिच्यावरच चाकूने वार केले. घरातील दाेन लाख रुपये घेऊन सिद्धांत फरार झाला होता.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...