आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्या सिंह खून प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - इंदूरच्या अबकारी शुल्क आयुक्त जे.पी. सिंह यांच्या पत्नी संध्या सिंह (मुंबई) यांच्या खून प्रकरणाचे गूढ लवकरच उकलले जाण्याची शक्यता आहे. पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली असून संध्या यांच्या खुनात निकटवर्तीय सहभागी असू शकतात, असा संशय आहे. या प्रकरणी संध्या यांचे पुत्र रघुवीर (23) याची पोलिसांनी तिस-या दिवशी चौकशी केली.

संध्या या संगीतकार जतीन-ललित व अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या भगिनी होत. मुंबईत राहणा-या संध्या काही दिवसांपूर्वी घरातून अचानक गायब झाल्या होत्या. त्या वेळी त्यांच्याजवळ 25 लाख रुपये रोख व दागिने होते. हे दागिने बँकेत ठेवण्यासाठी त्या मैत्रीण उमा गौर यांच्यासह घरातून बाहेर पडल्या होत्या. परंतु त्या घरी परतल्याच नाहीत.

धक्कादायक बाब म्हणजे त्या बँकेतदेखील पोहोचल्या नव्हत्या. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर त्यांच्या घराशेजारीच सापडलेला सापळा हा संध्या यांचाच होता, असे तपासात आढळले. संध्या यांचा खून निकटवर्तीयांकडून झाल्याचा संशय आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांच्या मुलाची सलग तिस-या दिवशी कसून चौकशी केली. शनिवारी रात्रीही त्याला सोडण्यात आलेले नव्हते. लवकरच या प्रकरणाचे गूढ उकलले जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.