आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सन ऑफ सरदार' प्रदर्शनापूर्वीच गोत्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'सन ऑफ सरदार' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अडचणीत सापडला आहे. या चित्रपटामध्ये अजयने शीख समुदायाबाबत डायलॉगबाजी केल्याने त्याला या समुदायाकडून नुकतीच कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
13 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचा प्रोमो काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, शीख समुदायावर केलेल्या वक्तव्यामुळे हा समाज कमालीचा नाराज झाला असून नुकतीच एका शिष्टमंडळाने अजयला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला एका आठवड्यात उत्तर देण्याचे सांगण्यात आले आहे. 'सन ऑफ सरदार'मध्ये कॉमेडी, रोमान्स, अँक्शन आणि भरपूर मसाला आहे. ज्या दिवशी हा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला तेव्हापासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
अश्विन-अजय पुन्हा एकत्र- 'सन ऑफ..' या चित्रपटाचे दिग्दर्शन हे अश्विन धीर यांनी केले आहे. याआधी अजयने त्यांच्यासोबत 'अतिथी तुम कब जाओगे' हा चित्रपट केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता पुन्हा एकदा अजय आणि अश्विन 'सन ऑफ सरदार'मधून एकत्र येत आहेत. त्यामुळे पुन्हा ही जोडी आपली कमाल दाखवेल, असे चित्रपट जाणकारांना वाटत आहे.
अडचणी वाढणार- या चित्रपटात अजय एका सरदार तरुणाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात इतर पात्रे ही पंजाबी आहेत. यामध्ये विशेष म्हणजे या चित्रपटाची सहनिर्मिती अजय देवगणने केली आहे. चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, जुही चावला, मुकुल देव आणि बिंदू दारासिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.'सन ऑफ.'चे फस्र्ट लूक सध्या टीव्हीवर धूम करत आहेत. जबरदस्त स्टारकास्ट आणि इतर बाबींमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देईल असे अजय देवगणला वाटत आहे. मात्र, शीख समाजाचा रोष निर्माण झाल्यामुळे या चित्रपटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.