आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत म्हाताऱ्या आईचे हात-पाय बांधले, पंख्याला अडकवले, सुनेने शुट केला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कापडाने मुलगा आईचा गळा आवळतो. - Divya Marathi
एका कापडाने मुलगा आईचा गळा आवळतो.
मुंबई- म्हाताऱ्या आईवडीलांमध्येच तुमचा देव आहे. त्यांची सेवा करा. आयुष्य सुखी होईल असे सांगितले जाते. शिकवण दिली जाते. पण एका मुलाने जन्मदात्या आईवरच एवढे अत्याचार केले की या मातेने मुलगा नव्हे तर राक्षस जन्मायला घातला आहे, असे म्हणावे लागेल.
80 वर्षीय म्हाताऱ्या आईचे हात-पाय ओढणीने बांधून पंख्याला टांगणारा विक्षिप्त मुलगा सुरेंद्र सत्तार वैद्य याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग या म्हातारीची मुलगी, सून आणि नातीने केले. हे करताना या तिघी प्रचंड जोरजोरात हसताना दिसून येतात.
आई-मुलाच्या आणि आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. पीडित महिलेचे नाव मायावती आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरेंद्र तिला छळत असल्याचे उघडकीस आले आहे. भाऊ अत्याचार करत असताना किमान बहिणीने त्याला रोखायला हवे होते. पण तीही या घटनेचा व्हिडिओ काढण्यात धन्यता मानते हेही या घटनेचे विदारक वास्तव समोर आले आहे.
काय आहे या व्हिडिओत
सुरेंद्र हा मायावती यांचा गळा आवळताना दिसून येतो. त्यानंतर एका कापडाने तोंड दाबून धरतो. मायावती यांना श्वास घेणेही कठिण होऊन बसते. त्या ओरडण्याचा प्रयत्न करतात. पण मुलगा तोंड जोरात दाबतो. त्यानंतर हाय बांधतो. यावेळी पंख्याला गुलाही रंगाची ओढणी टांगलेली असते. यावेळी तो बायकोला म्हणतो की, छुरी घुसा पेटमें... छुरी घुसा पेटमें... म्हणजे कदाचित तिला ठार मारण्याचा तो प्रयत्न करत असावा. यावेळी त्याची बहिण, बायको आणि मुलगी या घटनेचा आसुरी आनंद लुटताना दिसून येतात.

या घटनेत सुरेंद्रला मदत करणारी त्याची पत्नी आणि बहिणीविरोधातही डीएननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा सुरेंद्र, सून आणि मुलीविरोधात भारतीय दंडविधान कलम 354, 352, 336, 506 (2अ), 504 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

पोलिसांनी मुलगा, सून आणि मुलीला अटक केली असून त्यांना आज अंधेरी कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे फोटो.... असा आवळतो गळा... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...