आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonali Kulkarni Visited Divya Marathi, Shutter Releasing Today

सचिन खेडेकर, सोनालीचा "शटर' आज चित्रपटगृहांत, कलाकारांचा मनमाेकळा संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला "शटर' हा चित्रपट शुक्रवारी राज्यातील सुमारे १४४ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मल्याळम भाषेतील चित्रपटाचा हा रिमेक आहे.

"शटर' चित्रपटातील कलावंत, दिग्दर्शकांच्या टीमने गुरुवारी दै. "दिव्य मराठी'च्या मुंबईतील माहिम कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला. या वेळी सोनाली म्हणाली, "शटर' चित्रपटात रहस्य, रंजकता असे सारे रंग आहेत. मल्याळी भाषेतील चित्रपटाचा मराठीत रिमेक करताना दिग्दर्शक व्ही. के. प्रकाश यांनी मराठी चित्रपट कसे असतात याचा फार बारकाईने अभ्यास केला होता. त्या निरीक्षणांतूनच हा रिमेक मराठी प्रेक्षकांना आवडेल, असे त्यांचे मत झाले. त्यानंतरच त्यांनी या चित्रपटाला हात घातला. मध्यमवयीन माणसाची कथा असलेल्या या चित्रपटाची कथा धक्कातंत्राने जाणारी आहे. चोवीस तासांमध्ये चार व्यक्तींबरोबर काही अशा आकस्मिक घटना घडतात की या अनपेक्षित धक्क्यांनी ते कसे गोंधळतात, कधी त्यांचा थरकाप उडतो, अशी चित्रपटाची कथा आहे.

दोन कॅमेऱ्यांनी चित्रीकरण
सिलिकॉन मीडिया ट्रेंड्स अॅडफिल्म मेकर्स प्रा. लि. "शटर' चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटातील गीते मंगेश कांगणे आणि अश्विनी शेंडे यांनी लिहिली असून पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. दक्षिणेतील अनेक तंत्रज्ञ शटरच्या निमित्ताने प्रथमच मराठी चित्रपटासाठी काम करत आहेत हेही या चित्रपटाचे वैशिष्ट्य. फक्त दोन कॅमेरे वापरून व मुंबईतील फिल्ससिटी येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात स्वत: प्रकाश यांनी काम केले असून जयंत वाडकर, कमलेश सावंत आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.