आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूर कन्या सोनम पुनीत मल्होत्रासोबत ‘कॅमेराबंद’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवूडमध्ये सोज्वळ इमेज असणारी अभिनेत्री आणि अनिलकन्या सोनम कपूरचे दिग्दर्शक पुनीत मल्होत्रासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच या दोघांना एका नाइट क्लबमध्ये माध्यमांच्या प्रतिनधींनी त्यांच्या कॅमे-यात कैद केले. ही पार्टी रात्री उशिरापर्यत सुरू असल्यामुळे पोलिस त्या ठिकाणी ताफ्यासह दाखल झाले. त्यानंतर हे दोघेही तेथून एकत्रितपणे बाहेर आले. त्यांच्या वर्तणुकीवरून सोनम आणि पुनीतमध्ये मैत्रीपलीकडचे नाते असल्याची शंका उपस्थितांमध्ये रंगली होती. ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ या चित्रपटापासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. मात्र पापा अनिलच्या धाकाने सोनमने नेहमी याबाबत टाळाटाळ करून विषयांतर केल्याचे सूत्रांनी सांगितले.