आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi And Rahul Gandhi At Deekshabhoomi In Nagpur

रोहितची आत्‍महत्‍या नाही बलिदान-राहुल, सोनिया म्‍हणाल्‍या- RSS चालवते देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- रोहित वेमुलाने आत्‍महत्‍या केली नव्‍हे तर, ते बलिदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केलेले प्रश्नच रोहितने मांडले, असे म्‍हणत राहुल गांधी यांनी सत्‍ताधारी व संघावर टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्‍या जयंती महोत्सवानिमित्‍त समारोप समारंभात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नागपूरात सभा होत आहे.
काय म्‍हणाले राहुल....
- आरएसएस, मनूच्या विचारापुढे झुकत नसल्यामुळे माझ्यावर सतत हल्ले केले जातात.
- मंत्रीमंडळ मंत्री नव्‍हे, तर आरएसएस चालवत आहे.
- डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्नच रोहित वेमुलाने मांडले.
- रोहितने आत्महत्या केली नाही, तर बलिदान दिले आहे.
- काँग्रेस पक्ष डॉ. बाबासाहेबांसोबत उभा राहिला.
- संविधानांच्या माध्यमातून काँग्रेस व डॉ. आंबेडकरांनी मनूच्या विरोधात लढा दिला.
- आजही या देशात मनूचा विचार जिवंत आहे.
राहुल गांधी यांच्‍या भाषणानंतर सोनिया गांधी यांनीही सरकारवर टीका केली.
काय म्‍हणाल्‍या सोनिया गांधी....
- लोकशाहीची हत्या करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे.
- भाजप विभाजनाचे राजकारण करत आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत.
- आदिवासी आणि दलितांचे आरक्षण धोक्यात आहे.
- देशाला संघ आणि भाजपच्या विचारांपासून धोका आहे.
- आरएसएसच्या इशाऱ्यावर देशाचा कारभार चालतो.
आठवडाभर सरकारतर्फे विविध कार्यक्रमाचे नियोजन..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे निमित्त साधून पुढील आठवडाभर मोदी सरकारने विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याचनिमित्ताने मोदी सरकारने 14 एप्रिल ते 24 एप्रिल या दरम्यान 10 दिवसाचे ग्रामोदयातून भारत उदय अभियान राबविण्याचे ठरवले आहे. सामाजिक समरसता, पंचायतींचे मजबुतीकरण, गावांचा विकास आणि शेतक-यांच्या प्रगतीसाठी हे अभियान समर्पित केले आहे. या अभियानाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांचे जन्मस्थळ महू येथून करणार आहेत.
मोदी सरकारच्या व भाजपच्या या कार्यक्रमाला शह देण्याबरोबरच आपणच आंबेडकरांचे राजकीय वारसदार असल्याचे दाखवून देण्यासाठी काँग्रेसने नागपूरमधील दीक्षाभूमी येथे कार्यक्रम घेतला आहे. यासाठी सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आज दुपारी 3.30 च्या सुमारास नागपूर विमानतळावर दाखल झाले. तिथून दोघेही थेट दीक्षाभूमी येथे गेले व नंतर सभास्थळी आले. या सभेनंतर सोनिया गांधी दिल्लीला तर राहुल गांधी मुंबईला जाणार आहेत.
पुढे वाचा, भाजपला शह देण्याचा काँग्रेस प्रयत्न...
स्वतंत्र विदर्भाच्या आश्वासनाची काँग्रेसला आठवण करून देणार...