आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Rahul Gandhi Tomorrow On Maharashtra For Election Rally, Divya Marathi

सोनिया - राहुल उद्यापासून करणार महाराष्ट्रात प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारसभांना राज्यात आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. दोघेही एकामागोमाग जाहीर सभा घेऊन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. राहुल हे बुधवारी कोकणातील महाडमधून प्रचाराला सुरुवात करतील. दुपारी ३.३० वाजता ते मराठवाड्यातही लातूर जिल्ह्यातील औसा येथे सभा घेणार आहेत. ९ ऑक्टोबर रोजी सोनिया गांधी, दहा रोजी पुन्हा राहुल आणि ११ रोजी सोनिया गांधी असे सभांचे नियोजन करण्यात आल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
महाड येथून सुरुवात करण्यामागे तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतिस्थळाला अभिवादन करून दलित मतदारांना भावनिक साद घालण्याची रणनीती असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही सभांना राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.