मुंबई/अमरावती- बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नवनीत कौर हिने सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. 2 फेब्रुवारी 2011 रोजी झालेल्या या सामुहिक विवाह सोहळ्यात 3162 जोडपे विवाहाच्या बंधनात अडकले होते. त्यात 2443 हिंदु, 739 बौद्ध, 150 मुस्लिम, 15 ख्रिश्चन आणि 13 अंध जोडप्यांचाही समावेश होता.
आमदार रवी राणा यांना अनेक दिग्गज आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योग गुरू रामदेव बाबा, सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासह बॉलिवूडमधील विवेक ओबेरॉय देखील सहभागी झाले होते.
नवनीत कौर आणि वाद... एक पक्के समीकरणपंजाबी कुटुंबात जन्मलेल्या नवनीत कौर- राणा यांनी मार्च 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अमरावतील लोकसभा निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता. त्यावेळी विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.
याशिवाय काही दिवसांपूर्वी नवनीत यांनी त्यांच्या फोटोशी छेडछाड करुन फेसबुक आणि व्हॉट्स्अपवर पोस्ट केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार केली होती. त्यांनी हे विरोधकांचे कृत्य असल्याचे म्हटले होते.
रामदेव बाबांच्या आश्रमात झाली रवी राणांची भेट
नवनीत कौर यांना योगाची आवड आहे. त्या योग गुरु रामदेव बाबा यांच्या शिष्य आहेत. त्याचे पती रवी राणा हे देखील रामदेव बाबांना मानतात. रामदेव बाबा यांच्या एका शिबीरातच रवी राणा आणि नवनीत यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी रामदेव बाबांच्या परवानगीनेच नाते संबंध वाढविले. 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर नवनीत यांनी चित्रपटांना रामराम केला आणि पतीसोबत राजकीय मार्ग निवडला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नवनीत कौर यांची खासगी आणि राजकीय आयुष्यातील काही महत्त्वाचे फोटो...