आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये जपानच्या साह्याने सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जपानच्या सहकार्याने बीड जिल्ह्यात सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार असून पुढील महिन्यात जपानचे एक शिष्टमंडळ पाहणीसाठी बीड दौऱ्यावर येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिली. या प्रकल्पाचा बीडसह संपूर्ण मराठवाड्यातील साेयाबीन उत्पादकांना लाभ हाेणार अाहे.

जपानचे भारतातील उच्चायुक्त योशियाकी इटो यांनी येथील वकिलातीमध्ये पंकजा मुंडे व त्यांचे पती अमित पालवे यांना शुक्रवारी स्नेहभोजनास आमंत्रित केले होते. त्या वेळी झालेल्या चर्चेत यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, मुंडे यांनीही इटो यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले.
राज्यातील शेती पुरक उदयोगधंदे वाढवण्यावर बैठकीत विस्तृत चर्चा झाली. शेती-जोड व्यवसाय करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जपान महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करून नवीन वाण विकसित करण्यांत येत आहे. त्यामुळे फळांचे उत्पन्न वाढणार आहे. मराठवाड्यात सततच्या दुष्काळाला शेतकरी तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर शेतक ऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली होती. या प्रकल्पासाठी जपान संपूर्ण सहकार्य करेल व त्यासाठी एक शिष्टमंडळ २६ फेब्रुवारीला बीड जिल्हयात पाहणी करण्यासाठी पाठवू, उच्चायुक्तांनी सांगितल्याचे मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, मुंडे यांनीही इटो यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारलेही. पाणी पुरी आणि पुरण पोळी आपल्याला विशेषत्वाने आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुमीटोमो कार्पोरेशन इंडिया प्रा. लि. कंपनीचे सरव्यवस्थापक वाकाबायाशी, जी.आर.अे. कंपनीचे मॅनेजर योसुके काटो हे बडे उद्योजक तसेच राष्ट्रीय ग्रामीण आणि कृषी बँकेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. यु. एस. शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात मोठे क्षेत्र
राज्यात सोयाबीनचे ३८.७०४ लाख हेक्टर क्षेत्र असून सुमारे ४८.५६ लाख मे. टन सोयाबीनचे उत्पादन होते. मराठवाड्यातील हेच क्षेत्र १५.०९ लाख हेक्टर (१२.६७ लाख मे. टन) असून बीड जिल्ह्यात सोयाबीनचे १.५३३ लाख हेक्टर (१.४१८ लाख मे. टन उत्पादन) क्षेत्र आहे.