आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रीच सोयाबीनला सहा हजार भाव का देत नाहीत : काँग्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती, आता ते मुख्यमंत्री आहेत तरी सोयबीनला हा भाव का मिळवून देत नाहीत? असा सवाल प्रदेशचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला अाहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी अात्महत्यात वाढ हाेत अाहे, असा अाराेपही त्यांनी केला.

सावंत म्हणाले, ‘फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी भाजप नेते पाशा पटेल यांच्या शेतकरी दिंडीत सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती. पण तेच मुख्यमंत्री झाल्यापासून दुर्दैवाने सोयाबीनच्या हमी भावात उल्लेखनीय वाढ झाली नाही. यंदा राज्य शासनाने हमी भावासाठी केंद्राकडे शिफारस केलेली रक्कम ही ४५९९ रु प्रतिक्विंटल होती, निदान ती तरी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल करणे अभिप्रेत होते. केंद्र सरकारने यंदा सोयबीनला २७७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला अाहे, तो फडणवीस यांनी मागणी केलेल्या सहा हजारांच्या ५० टक्केही नाही. यातून भाजप सरकारची आणखी एक जुमलेबाजी दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी राणा भीमदेवी थाटात राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाचे १२ तास वीज देऊ, अशी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात दिवसाचे पाच सहा तासही वीज मिळत नसल्याचे ते म्हणाले. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या दोन वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०१४ साली राज्यात १९८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१५ साली हा अाकडा ३२२८ वर पोहोचला तर या वर्षातील ऑगस्ट महिन्यापर्यंत २०५३ शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे सावंत म्हणाले.
आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यानेच इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या हाेत अाहेत, असा अाराेपही सावंत यांनी केला.

शेतीमालाला भाव नाही, वीज नाही, कर्जमाफी नाही, चार वर्षांपूर्वीचा भावही आज शेतीमालाला मिळत नाही. महागाई शेतकऱ्याला लागू होत नाही असे सरकारचे म्हणणे आहे त्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त करणारे वातावरण सरकारच तयार करत आहे असा आरोप सावंत यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...