आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SP BSP Protest Amitabh Bachchan On Raj Thackeray

अमिताभ यांना जया बच्चन यांच्या पक्षापासून धोका, बंगल्याबाहेर कडक पोलिस बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावरून अमिताभ बच्चन यांचा समाजवादी पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्षाकडून (बसप) तीव्र विरोध सुरू आहे. बॉलिवूडच्या महानायकाविरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. सप आणि बसप कार्यकर्त्यांच्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अमिताभ यांच्या जलसा आणि प्रतिक्षा या दोन्ही बंग्ल्यांबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार आहेत.
मनसेच्या चित्रपट कामगार सेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे एकत्र आले होते. राज आणि अमिताभ यांचे हे मनोमिलन सप आणि बसपला पसंत आलेले नाही. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दलच्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही, असे असताना अमिताभ यांनी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणे योग्य नसल्याचे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.