मुंबई- हजारों ट्रान्सजेंडर्स आज (बुधवारी) सकाळी मुंबईच्या रस्त्यावर उतरून आंदोलन केले. गुन्हेगारी कारवाया थांबाव्यात आणि समाजात त्यांना समानहक्क मिळवण्याच्या मागणीसाठी ट्रान्सजेंडर्सनी हे आंदोलन केले.
दरम्यान, देशात आजही ट्रान्सजेंडर्सना हीन वागणूक दिली जाते. त्यांचे आयुष्य अनेक अडचणींने वेढले आहे. स्पेनचे फोटोग्राफर अलेसांड्रो व्हिसेंसझी यांनी आपल्या फोटो सीरिजमधून मुंबईत राहाणार्या ट्रान्सजेंडर्सची लाइफस्टाइल दाखवली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाचगाणे करावे लागते तर काही देहविक्री करून पैसा कमावतात.
- स्पेनचे फोटोग्राफर अलेसांड्रो व्हिसेंसझी नेहमी आपल्या प्रोजेक्टसाठी भारतात येतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील ट्रान्सजेंडर्सच्या आयुष्यावर एक फोटो सीरिज केली होती.