आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Lesson's To Student To Make Them Scientist

शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ हाेण्याचे धडे, तज्ज्ञांच्या मदतीने शिक्षण विभाग उभारणार यंत्रणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता हेरून त्यांना शास्त्रज्ञ बनवण्याच्या दृष्टीने एक विशेष यंत्रणा तयार करण्याच्या हालचाली शालेय शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि ज्येष्ठराज जोशी यांच्यात बुधवारी एक बैठक पार पडली.

महाराष्ट्रात अधिकाधिक शास्त्रज्ञ किंवा विविध विषयांतील तज्ज्ञ तयार करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने हालचालींना सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांत नोक-या मिळणे सोपे होईल, अशा सेवा क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमाला तरुण वर्ग अधिक पसंती देताना दिसतो. एखाद्या विषयात मूलभूत संशोधन करून त्या क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवण्याची इच्छा फार कमी विद्यार्थी व्यक्त करतात. शिवाय मार्गदर्शनाचाही मोठा अभाव शिक्षण व्यवस्थेत दिसतो. ही बाब तसेच मूलभूत संशोधनाबाबतची तरुणांची उदासीनता व मानसिकता लक्षात घेऊन आता शालेय वयातच विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता हेरून, त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना शास्त्रज्ञ करण्यायोग्य अभ्यासक्रमाची आखणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरवले आहे.

अाराखडा प्राप्त हाेताच पुढील नियाेजन
बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक अनिल काकोडकर आणि रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक ज्येष्ठराज जोशी यांची मंत्रालयात बैठक झाली. यात प्राथमिक स्तरावरील चर्चा झाली असून त्याबाबतचा आराखडा या तज्ज्ञांमार्फत बनवला जाणार अाहे. हा आराखडा सरकारला प्राप्त झाल्यानंतर त्यावर पुढील नियोजन करता येईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले.