आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; डेक्कन क्वीन, पंचवटी, गोदावरी रद्द, काही उशिराने पोहचणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य रेल्वेकडून ठाकुर्ली येथील उड्डाणपुलाचा गर्डर टाकण्यासाठी रविवारी (दि. 20) सकाळी 9.15 ते 12.45 मध्ये साडेतीन तासांचा ​विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. - Divya Marathi
मध्य रेल्वेकडून ठाकुर्ली येथील उड्डाणपुलाचा गर्डर टाकण्यासाठी रविवारी (दि. 20) सकाळी 9.15 ते 12.45 मध्ये साडेतीन तासांचा ​विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई/पुणे- मध्य रेल्वेकडून ठाकुर्ली येथील उड्डाणपुलाचा गर्डर टाकण्यासाठी रविवारी (दि. 20) सकाळी 9.15 ते 12.45 मध्ये साडेतीन तासांचा ​विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी ठाकुर्ली मार्गावरील 6 मार्गिका साडेतीन तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे लोकल फेऱ्यांप्रमाणेच मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. 
 
ब्लॉक कालावधीत डोंबिवली-कल्याणमध्ये डाऊन आणि अप स्लो आणि फास्ट मार्गाप्रमाणेच पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी ९.१० ते १२.५० पर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहेत. तसेच सकाळी 8.36 ते 11.34 मध्ये सीएसएमटी ते कसारा, आसनगाव, टिटवाळा आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ अप व डाऊन सेवा बंद राहणार आहे. 
 
कोणत्या मेल, एक्स्प्रेस रद्द
मुंबई-पुणे डेक्कनक्वीन, मनमाड-मुंबई पंचवटी, एलटीटी मनमाड-गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासह, नाशिक आणि पुण्यावरून मुंबईत येणाऱ्या गाड्या कल्याणच्या आधीच थांबविण्यात येणार आहेत. तसेच, पुण्यावरून मुंबई येणाऱ्या मेल एक्स्प्रेस व्हाया कर्जत-पनवेल-दिवा चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गाड्या किमान 10 ते 40 मिनिटे उशिराने पोहोचतील, अशीही सूचना मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. मुंबईहून दक्षिण-पूर्व जाणाऱ्या डाऊन मेल-एक्स्प्रेस गाड्या व्हाया दिवा-पनवेल-कर्जतवरून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याण येथील प्रवाशांना मेल/एक्स्प्रेससाठी दिवा येथे जावे लागणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...