आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Package For Drought Hit Area Union Agricultur Minister Radhamohan

टंचाईसदृश भागासाठी केंद्रातर्फे विशेष पॅकेज देऊ, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील काही भागांत या वर्षीही टंचाईसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे पैसेवारीचा अहवाल आल्यानंतर या भागांसाठी एनआरडीएफच्या निकषानुसार विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शुक्रवारी दिली.
राज्यातील कृषी योजनांचा आढावा घेण्यासाठी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एस. के. गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट आदी उपस्थित होते.

देशाच्या सर्वप्रथम कृषी क्षेत्राचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. उपलब्ध निधीचा जास्तीत जास्त आणि योग्य प्रकारे विनिमय करण्याची जबाबदारी राज्याची असल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले. बुलडाणा, वर्धा, नागपूर या जिल्हा बँकांना पुन्हा बँकिंग परवाना देण्याचा निर्णयही सिंग यांनी जाहीर केला.