आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 बॉम्बस्फोट: अबु सालेमसह सात दोषींविरोधात 16 जूनला टाटा कोर्ट सुनावणार निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी स्पेशल टाडा कोर्टात आज (सोमवारी) सुनावणी पूर्ण झाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह 7 दोषींविरुद्ध यात्या 16 जूनला कोर्ट निकाल सुनावणार आहे. 1993 मध्ये मुंबई 12 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 257 जणांना मृत्यू झाला होता.

अबु सालेमसह 7 दोषी..
- स्पेशल टाडा कोर्टात 25 एप्रिल रोजी झालेल्या अंतिम सुनावणी झाली होती. दोषींना शिक्षा सुनावण्याची 29 मे ही तारीख निश्चित करण्‍यात आली होती. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.
- सालेमसह 6 दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्यात मुस्ता दौसा, फिरोज खान, ताहिर मर्चेट, रियाज सिद्दीकी, करीमुल्ला शेख आणि अब्दुल कयूम या दोषींचा समावेश आहे.
- मुंबईत साखळी बॉम्बस्फोट करण्‍यापूर्वी संजय दत्तच्या घरात दोन एके-47 रायफल्स आणि ग्रेनेड लपवण्याचा सालेमवर आरोप आहे.
- संजय दत्त याला एके-47 रायफल बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्याला पाच वर्षांची सुनावण्यात आली होती.

संजयला शस्त्र दिल्याचा आरोप अबूने फेटाळला होता...
- संजयला शस्त्र दिल्याचा आरोप अबु सालेमने फेटाळला होता. 2015 मध्ये टाडा कोर्टात ही सुनावणी झाली होती.
- सालेमने आयपीसीच्या कलम 313 नुसार कोर्टात आपला जबाब नोंदवला होता.
- दरम्यान, 30 जुलै, 2015 रोजी मुंबईत झालेल्या ब्लास्टप्रकरणी याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मुंबईत केव्हा आणि कुठे झाले साखळी बॉम्बस्फोट...
- पहिला ब्लास्ट- दुपारी 1.30 वाजता , मुंबई स्टॉक एक्सचेंज
- दूसरा ब्लास्ट-दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट
- तिसरा ब्लास्ट-दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन
- चौथा ब्लास्ट -दुपारी 2.33 वाजता, एअरइंडिया बिल्डिंग
- पाचवा ब्लास्ट -दुपारी 2.45 वाजता, सेन्चुरी बाजार
- सहावा ब्लास्ट -दुपारी 2.45 वाजता, माहिम
- सातवा ब्लास्ट- दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार
- आठवा ब्लास्ट -दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल
- नववा ब्लास्ट -दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा
- दहावा ब्लास्ट - दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटर हॉटेल
- अकरावा ब्लास्ट -दुपारी 3.30 वाजता, सहारा एअरपोर्ट
- बारावा ब्लास्ट -दुपारी 3.40 वाजता, एअरपोर्ट सेंटर हॉटेल
बातम्या आणखी आहेत...