आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीच्या काेंडीवर पर्याय; मुंबई पाेलिसांची ‘सेगवे’ने गस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईसारख्या संवेदनशील शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम राखण्यासाठी पोलिस गस्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या गस्तीच्या आधारेच पोलिसांनी अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यात यश मिळवले अाहे. मात्र, मायानगरीतील वाहनांची वर्दळ पाहता या गस्तीपथकांना वाहतूक कोंडी आणि सिग्नल्सचा माेठ्या प्रमाणावर अडथळा येत अाहे. अाता त्यावरही पर्याय शाेधण्यात अाला असून गस्तीपथकाच्या दिमतीला अाता ‘सेगवे’सारखे अत्याधुनिक उपकरण तैनात करण्यात अाले अाहे. त्यामुळे पाेलिसांना अधिक वेगवान गस्त घालणे शक्य हाेईल.  
 
सध्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, थायलंड तसेच चीन यासारख्या अनेक देशांमधील पोलिस सेगवे या अत्याधुनिक आणि कमी जागेत मावेल अशा उपकरणाचा प्रभावी वापर करत आहेत. त्याच धर्तीवर मुंबई पोलिसांनाही मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर दोन सेगवेज उपलब्ध करून देण्यात आले अाहेत.  ते चालवण्याचे प्रशिक्षण सध्या दिले जात आहे. गस्तीसाठी आतापर्यंत जीप, मोटारसायकल आणि काही ठिकाणी सायकलींचा वापर केला जात होता.यात वाहतूक कोंडी जाणवाची. अनेकदा त्यासाठी निधीची पुरेशी तरतूद नसल्याने ही वाहने बऱ्याचदा विनावापर पडून राहतात. या सर्व अडचणींवर ‘सेगवे’मुळे मात करता येणे शक्य आहे.  
 
बॅटरीवर चार्ज, ताशी २० किमी वेग  
सेगवे हे एक विद्युत उपकरण असून एकदा त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर किमान सात ते आठ तास त्याचा वापर करता येतो. ताशी २० किमी वेगाने धावू शकणाऱ्या या सेगवेवर एक व्यक्ती आरामात फिरू शकते. तसेच या उपकरणाच्या दोन्ही चाकांवर दोन बॉक्स लावण्यात आले असून त्यामध्ये वॉकी टॉकीज, डायरी, पाण्याच्या बाटल्या यासारख्या वस्तू ठेवता येतील.

क्वीन्स नेकलेसच्या पदपथावरून सुरुवात  
सेगवेमुळे फुटपाथ, चौपाट्या, अरुंद गल्ल्या आणि गर्दीची ठिकाणी गस्त घालणे सुलभ होणार आहे. विशेषकरून जुहू, गिरगाव, शिवाजी पार्क यासारख्या समुद्रकिनाऱ्यांवरील वेगवान गस्तीसाठी याचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. चौपाट्यांवरील गस्तीसाठी आतापर्यंत जाड टायरच्या सायकलींचा वापर करण्यात येत होता. मात्र, त्याऐवजी सेगवे हे अधिक उपयुक्त उपकरण ठरू शकते. सध्या मरीन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटी या क्वीन्स नेकलेसवरील पदपथावर सेगवेवरून गस्त घातली जाणार अाहे. तिथे हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर भागांमध्येही या उपकरणाच्या मदतीने पाेलिसांची गस्त घातली जाईल.  
- मनोजकुमार शर्मा, पाेलिस उपायुक्त मुंबई
बातम्या आणखी आहेत...