आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतील उत्स्फूर्तता अाशयाइतकीच महत्त्वाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अगदी अातून अालेल्या ऊर्मीची, अस्वस्थतेची, भावावस्थेची कवितेतून हाेणारी अभिव्यक्ती एकदा मनाला भावली की तिच्यातले मर्म हळूहळू कळत जाते. कवी दासू वैद्य यांची कविता अशीच अलवार अाणि तरीही खाेलात शिरणारी अाहे. कवितेतील उत्स्फूर्तता अाशयाइतकीच महत्त्वाची अाहे हे त्यांच्या कवितेतून जाणवते,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक दिगंबर पाध्ये यांनी केले. प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांना ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहासाठी मुंबई येथील विलेपार्लेमधील गाेखले सभागृहात मॅजेस्टिक प्रकाशनाच्या वतीने केशवराव काेठावळे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात अाला. या वेळी ते बाेलत हाेते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैद्य यांनी पुरस्कारादाखल मनाेगत व्यक्त करताना अापला अाजवरचा प्रवास मांडला. ते म्हणाले, लहानपणापासून कवितेसाठी अापसूकच जगण्याने पाठबळ पुरवले, कविता लिहायला लागलाे तेव्हा अापण कविता लिहीत नाही तर कविता जगताे अाहाेत ही जाणीव झाल्यापासून कवितेकडे, साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकाेनच बदलून गेला. हा प्रवास मांडताना त्यांनी समकालीन कवितेला साहित्यामध्ये तसेच वाचकांमध्ये मानाचे स्थान मिळणे अावश्यक अाहे, असेही नमूद केले. या वेळी व्यासपीठावर मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशाेक काेठावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते.