आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेनेला मी हात जोडून विनंती करते की, जाहिरातबाजी थांबवा- सुप्रिया सुळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप-शिवसेनेच्या सरकारला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीवर पैसे उडवणे कृपा करुन थांबवा. जाहिरातीबाजीवर खर्च होणारे ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांना आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना द्या, चांगला हमीभाव द्या. जाहिरातबाजीवरच्या खर्चातला निधी जर गरीब माणसाला दिलात, तर तुम्हाला त्यांचे दोन चांगले आशीर्वाद मिळतील.”, अशी अर्जाव खासदार सुप्रिया सुळेंनी भाजप-शिवसेनेला केली. हे अर्जाव करताना सुप्रिया सुळेंनी हातही जोडले.
 
खासदार सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बाचचित करताना भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच हात जोडून सर्वसामान्यांसाठी काम करा अशी विनंतीही केली.
 
खासदार सुळेंनी शिवसेनेने काढलेल्या 'घोटाळेबाज भाजपा' या पुस्तिकेवर टिप्पणी करताना म्हटले की, वास्तविक भाजप आणि शिवसेना एकाच सरकारमध्ये काम करतात. भलेही शिवसेनेचा सत्तेतील भाग कमी असेल पण ते सत्तेत आहेत ना. मग एकत्र सत्तेत राहून घोटाळेबाज भाजपा कसे म्हणता. जर भाजप घोटाळेबाज असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत कसे काय बसलाय. भाजप खरोखरच घोटाळेबाज असेल तर मग तुम्ही सत्तेत राहून भ्रष्टाचाराला सपोर्ट करता का असा सवाल उरतो. शिवसेनेला जर खरंच सर्वसामान्यांचे प्रेम असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे असे सुळेंनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...