आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sridevi\'s Bedroom Destroy In Heavy Fire At Andheri House

श्रीदेवीचा बेडरूम जळून खाक, मोठी आर्थिक हानी झाल्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवीच्या बेडरूमला आग लागून तो जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. ही आग एसी शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक देण्यात आली आहे. यात कोणीही जखमी झाले नाही पण श्रीदेवीच्या बेडरूममधील लाखोंची रोख रक्कम व काही मौल्यवान ऐवज जळून खाक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीत किती आर्थिक नुकसान झाले याची माहिती बोनी कपूर व कुटुंबियांनी दिली नसली तरी मोठी आर्थिक हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीदेवी पती बोनी कपूरसह अंधेरीत वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री तिच्या बेडरूमला अचानक लागली. त्यावेळी सर्व जण घरातच होते. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आग लागल्याचे कळताच श्रीदेवीने वीज पुरवठा करणारा मेन स्वीच ऑफ केला. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. पण तोपर्यंत बेडरूमने पेट घेतला होता. त्यामुळे बेडरूममधील कपाट व फर्निचर आगीत फस्मसात झाले. या कपाटात लाखो रूपयांची रोख रक्कम व काही दागिने व मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत. नुकसानीचा अंदाज व्यक्त करणे शक्य नसल्याचे श्रीदेवीचा मॅनेजर पंकज खरबंदा यांनी स्पष्ट केले. असे असले तरी कोट्यावधीत नुकसान झाल्याची चर्चा आहे. श्रीदेवी किंवा पती बोनी कपूर यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.