आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी पायावर उभे राहणेही नव्‍हते शक्‍य, आज आहे सेलिब्रिटी योगा टीचर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका मेहता. - Divya Marathi
दीपिका मेहता.
मुंबई - एका अपघातात तिच्‍या पायांना गंभीर दुखापत झाली. आता तू कधीच स्‍वत:च्‍या पायावर उभी राहू शकणार नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितले. पण, ती खचली नाही. आज तीच तरुणी देशातील प्रसिद्ध योग शिक्षिका आहे. जागतिक महिला दिनाच्‍या अनुषंगाने आम्‍ही सांगणार आहोत तिची संघर्ष गाथा....
कोण आहे ती तरुणी...
- ऐश्वर्या, प्रियंका, बिपाशा, जॅक्लिन आणि दीपिका पादुकोणसह अनेक हायप्रोफाइल लोकांना अष्टांग योगाचे ती प्रशिक्षण देते. दीपिका मेहता असे तिचे नाव आहे.
- मुंबईत राहणाऱ्या दीपिकाला अनेक फिटनेस मॅग्‍झीनने आपल्‍या मुख्‍यपृष्‍ठावर स्‍थान दिले आहे.
- सर्वात सेलिब्रिटी योग टीचरमध्‍ये तिचा समावेश होतो.
- 'योग सिटी' या टीव्‍हीवरील कार्यक्रमातून तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.
- फिटनेस शो 'द बिगेस्ट लॉसर' ची ती मास्टर ट्रेनरही होती.
- संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्‍या 'टेडएक्स' इव्‍हेंटमध्‍ये दीपिकाने डान्‍स आणि योगचे एकत्रित सादरीकरण केले होते.
अपघाताने बदलले आयुष्‍य
- गिर्यारोहण करताना वर्ष 1997 मध्‍ये दीपिका 40 फूट खोल खाली पडली होती.
- त्‍यानंतर सलग दोन वर्षे ती बेडवरच होती. चालणे फिरणे बंद होते.
- उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनीही सांगितले की, आता दीपिका कधीच स्‍वत:च्‍या पायावर उभी राहू शकणार नाही.
अशी जुळली योगाकडे
- बेडवरच राहून - राहून दीपिकाला कंटाळा येत होता. त्‍यातून वेळ घालवण्‍यासाठी तिने पुस्‍तकं वाचायला सुरुवात केली.
- त्‍यात योगावर आधारित पुस्‍तकं वाचल्‍याने ती योगाकडे आकर्षित झाली.
- बेडवर जमेल तशी ती योगा करत होती.
- दरम्‍यान डॉक्‍टरांचे प्रयत्‍न सुरूच होते.
- योगामुळे ती आपल्‍या पायावर उभी राहू शकली.
- त्‍यानंतर योगाचे प्रशिक्षिण घेण्‍यासाठी ती केरळला गेली.
- केरळमधील शिवनंदन योग केंद्रात तिने प्रशिक्षण घेतले.

कॉर्पोरेट्स कुटुंबांना देते प्रशिक्षण
- मुंबईतील बांद्रा परिसरात ती योगा क्‍लास चालवते.
- सोबतच बॉलीवुड सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट्स कुटुंबातील अनेकांच्‍या घरी जावून त्‍यांना योगाचे प्रशिक्षण देते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दीपिकाचे निवडक PHOTOS...