आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा... बोर्डाने जाहीर केले दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

 

दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिले आहेत. तरी छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

 

या नऊ केंद्रांवर होईल परीक्षा...

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

 

व्हॉट्सअॅपवरुन फॉरवर्ड होणार्‍या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका...

राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर संकेतस्थळ किंवा व्हॉट्सअॅपवरुन फॉरवर्ड होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...