मुंबई - दहावी बोर्डातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार्या परीक्षेचे अर्ज यंदा प्रथमच ऑनलाइन घेण्यात येणार असून त्याची सुरुवात शुक्रवारपासून होत आहे. नियमित शुल्कासह 1९ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील. शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या 22 ऑगस्टपर्यंत मंडळाकडे सादर करायच्या आहेत. 20 ते 2६ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. शाळांनी या विद्यार्थ्यांच्या याद्या 2८ ऑगस्टपर्यंत सादर करायच्या आहेत. याद्यांमध्ये त्रुटी राहिल्यास मंडळाकडून शाळांना नोटीसा पाठविण्यात येणार आहेत.