आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीचे हॉलतिकीट आज मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षा 3 मार्च रोजी सुरू होत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना सोमवारपासून हॉलतिकीट मिळणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

हॉलतिकीटास विलंब होत असल्याने मंडळाने कार्यक्रम आखून हॉलतिकीट शाळांपर्यंत पोहोचवले. परीक्षेचे साहित्य आणि हॉलतिकिटे वेळेत न मिळाल्याने मुख्याध्यापक महासंघाने लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेण्याची मागणी मंडळाकडे केली होती. शिक्षण मंडळाने हॉलतिकिटाशिवाय दहावीच्या सर्व तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश दिले राज्यातील सर्व शाळांना दिले होते. या आदेशानुसार सर्व तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या आहेत.