आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळशेज घाटात बस कोसळून 27 ठार, 6 जणांची प्रकृती गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळशेज घाट - मुंबई-आळेफाटा महामार्गावर माळशेज घाटात गुरुवारी ‘विठ्ठलवाडी-नगर’ एसटी बस 300 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 27 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे. 11 प्रवासी जखमी असून त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. समोरून येणार्‍या भरधाव ट्रकशी धडक टाळण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि सकाळी दहाची वेळ या दुर्दैवी प्रवाशांसाठी काळ ठरली. मात्र, बसचालकाने मद्य प्राशन केल्यामुळेच अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
ठाणे डेपोची विठ्ठलवाडीहून नगरकडे निघालेली एसटी पावणेदहाच्या दरम्यान माळशेज घाटात पोहोचली. मात्र ती एका वळणावर कल्याणकडे जाणार्‍या लाकडाच्या ट्रकला धडकली. यामुळे बसचालक के. एन. चौधरी याचा ताबा सुटून बस कठडे तोडत 300 फूट खोल दरीत कोसळली. एसटीकडून मृतांच्या नातेवाइकांना 3 लाख, सरकारतर्फे 2 लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मद्यपी बसचालकाने केला घात
डोंगरमाथ्यावरून पडताना मोठय़ा खडकांवर आदळत गेलेल्या बसचे छत उखडून निघाले आणि दरीत विसावेपर्यंत बसचे दोन तुकडे पडले. बस पडताना प्रवासी फेकले गेले आणि खडकावर आदळले. यातच अनेकांचे प्राण गेले.
पहाटे 5:45 वाजता नगरकडे निघालेल्या या बसचा चालक के. एन. चौधरी याने मद्यप्राशन केले होते, असे त्याचा मृतदेह बाहेर काढणारे प्रत्यक्षदर्शी रवी मस्करे यांनी सांगितले.तो इतका नशेत होता की, मुरबाड बसस्थानकावर नोंदही केलेली नव्हती.
प्रवाशांच्या संख्येतील घोळ
बसमधील तिकीट यंत्रानुसार गाडीत 37 प्रवासी होते. प्रत्यक्षात अपघातग्रस्त गाडीत 36 प्रवासी निघाले. शिवाय टोकावडे येथे चहा पिण्यासाठी उतरलेल्या 4 प्रवाशांना चालकाने त्यांना तेथेच सोडून दिले होते. त्यामुळे प्रवासी संख्येचा घोळ शेवटपर्यंत कायम होता.
पुढे पाहा, या भीषण अपघातातील छायाचित्रे...