मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावर स्कॉर्पियो आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 20 जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुगाव जवळ हा अपघात झाला.
मिळालेली माहिती अशी की, रामदास पठार येथून मुंबईकड़े निघालेल्या एसटी बसवर समोरून भरधाव वेगात येणारी स्कॉर्पियो तिच्यावर आदळली. स्कॉर्पियो गाडीतील चौघे गंभीर जखमी झाले तर बसमधील 20 प्रवाशी जखमी झाले आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक पाहा, एसटी बस व स्कॉर्पियोच्या भीषण अपघाताचे फोटो..