आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ठाण्यात एसटी बसला आग, जळून झाली खाक, जिवीतहानी नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर एका एशियाड एसटी बसला आज दुपारी लागलेल्या आगीत ती जळून संपूर्ण खाक झाली. सुदैवाने यात कोणतेही जिवीतहानी झाली नाही. वाहक व चालकाने दाखवलेल्या हुशारीमुळे ती टळली.
सोमवारी दुपारी बोरीवलीहून ठाण्याला ही बस चालली होती. यात वाहन, चालकासह 18 प्रवासी होती. मात्र, घोडबंदर रस्त्यावर बस येताच बसमध्ये स्पार्किंग होऊन बसला आग लागली.
चालकाला गाडीत काही तरी बिघाड झाल्याचे लक्षात त्याने उडी मारली व प्रवाशांना बाहेर पडण्यास सांगितले. त्याचवेळी बसला खालच्या बाजूने आग लागली होती. त्यानंतर चालकाने अग्निशमन विभागाला कॉल केला. मात्र, अग्निशमन दलाचे जवान पाण्याची गाडी घेऊन येईपर्यंत संपूर्ण बसने पेट घेतला होता. या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली. ही आग एवढी मोठी होती की बसमधील अॅल्युमिनियमचा पत्रा वितळून गेला होता.
बातम्या आणखी आहेत...