आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसच्या तिकीट सवलतीचा निर्णय घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काेट्यवधी रुपये ताेट्यात असलेले एसटी महामंडळ काही घटकांना बस तिकिटात देत असलेली सवलत रद्द करण्याच्या विचारात अाहे. राज्य सरकारकडून या सवलतीच्या बदल्यात मिळणारी रक्कम परत दिली जात नसल्याने असा निर्णय हाेण्याची शक्यता असल्याबाबत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली अाहे. त्यावर ‘राज्य सरकारने याबाबत चार अाठवड्यांत निर्णय घेऊन म्हणणे मांडावे,’ असे अादेश न्यायालयाने बुधवारी दिले.

स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, अंध-अपंग यांसारख्या २५ घटकांना एसटीच्या तिकिटात सवलत दिली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाचा ताेटा वाढत असल्याने त्यांचे अार्थिक गणित काेलमडले अाहे. त्यातच या सवलतीपाेटी देय असलेले तब्बल ३३३९ काेटी रुपये सरकारकडून महामंडळाला देण्यात अालेली नाही. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ या २५ घटकांना देत असलेली तिकिटातील सवलत रद्द करू शकते, वृत्तपत्रातील बातम्यांच्या अाधारे अशा अाशयाची याचिका दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात दाखल केली अाहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यासमाेर सुनावणी झाली.
एसटी महामंडळाचे वकील जी.एस. हेगडे यांनी न्यायालयात सांगितले की, तूर्त तरी ही सवलत रद्द करण्याचा महामंडळाने निर्णय घेतलेला नाही. राज्य सरकारच्या विविध विभागांकडे महामंडळाचे काेट्यवधी रुपये थकबाकी अाहे, मात्र ही थकबाकी पाठपुरावा करूनही मिळत नाही. सरकारने ही रक्कम त्वरित न दिल्यास अार्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला तिकिटत दिली जाणारी सवलत रद्द करण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल.