आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरीजवळ एसटी- कंटेनरची समोरासमोर धडक, 7 ठार तर 30 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीजवळील निवळी येथे एसटी आणि कंटेनर ट्रकमध्ये झालेल्या अपघातात सात प्रवासी ठार झाले आहेत तर 30 हून अधिक जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता एसटी व ट्रकचाही चक्काचूर झाला आहे. कंटेनरच्या धडकेने एसटी बस एका झाडाला अडकल्याने दरीत पडता पडता वाचली. सुमारे दोन तासहून अधिक वेळ एसटीतील प्रवाशी गाडीतच अडकून पडले होते. सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी दहाच्या सुमारास एक एसटी बस मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूनहून रत्नागिरीकडे जात होती. रत्नागिरीजवळील बाव नदीजवळ कोळसा घेऊन जाणा-या एका कंटेनरने एसटीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्हीही वाहनांचा चक्काचूर झाला. एसटी आंब्याच्या झाडाला लटकली. झाडाला एसटी अडकली नसती तर मोठी जिवीतहानी झाली असती. कारण एसटीत 40 ते 45 लोक प्रवास करीत होते.
बातम्या आणखी आहेत...