आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी चालकास मारहाण केल्यास खासगी वाहनधारकाचा परवाना रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई  - गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या चालक-वाहकांना किरकोळ कारणांवरून अन्य वाहनचालकांकडून मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एसटी चालकांना संरक्षण द्या आणि मारहाण करणाऱ्या अन्य चालकांना कठोर शिक्षा करण्याची मागणी चालक, वाहकांकडून केली जात होती. त्यानुसार एसटी बसेसना अडथळा करणाऱ्या तसेच चालक- वाहकांना मारहाण करणाऱ्या खासगी बसेस, आॅटोरिक्षा, टॅक्सी चालकांविरुद्ध मोटारवाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १९(१)(एफ)नुसार लायसन्स अपात्र अथवा रद्द करण्याचा तसेच परवाना निलंबित अथवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.    
 
फेब्रुवारी महिन्यात भिवंडी आगाराचे चालक प्रभाकर गायकवाड यांची आगारातील गेटवर असणाऱ्या रिक्षा चालकांसोबत झालेल्या वादात गायकवाड यांना काही रिक्षा चालकांनी मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त काम बंद आंदोलन करत मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती.    
 
दरम्यान, राज्यातील काही आगार व स्थानकातील एसटी चालक, वाहकांना अन्य वाहक-चालकांकडून मारहाणीच्या घटना घडल्या. त्याची गंभीर दखल घेत लायसन्स किंवा परवाना रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांकडून शुक्रवारी घेण्यात आला.    
 
कनिष्ठ कर्मचाऱ्यांना एक वर्षानंतर वाढीव वेतनश्रेणी
एसटी महामंडळात नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्याला सध्याच्या परिस्थितीत तीन वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्याला वाढीव वेतनश्रेणीचा लाभ हा थेट तीन वर्षांनंतरच मिळत होता. हा कालावधी कमी करण्याची मागणी हाेत हाेती. त्यानुसार अाता तो एक वर्षापर्यंत करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी विधिमंडळात दिली.  १२ हजार ५१४ कर्मचारी कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करत आहेत. त्यांना याचा लाभ मिळणार आहे.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...