आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचारी संपाच्या तयारीत, दिवाळीच्या तोंडावर पगारवाढीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही २५ टक्के पगारवाढ द्यावी, अन्यथा ऐन दिवाळीत संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी मंगळवारी दिला आहे. २०१२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी १३ टक्के पगारवाढीस मान्यता दिली होती.
१३ टक्के पगारवाढ समाधानकारक नव्हती. त्यामुळे एसटी महामंडळ देशातील सर्वात कमी पगार देणारे महामंडळ झाले असून एसटी कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. आंध्र, तेलंगणामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना ४० टक्के पगारवाढ दिली गेली. राज्यातील एसटी कमचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ का नाही, असे कामगारांचे म्हणणे आहे.

२०१६ मध्ये एसटी कामगारांचा नव्याने चारवर्षीय वेतन करार होणार आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे. त्याची तयारी म्हणून २९ आॅक्टोबर रोजी ‘इंटक’ने पुण्यातील स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शंखनाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामध्ये संपाबाबत निश्चित भूमिका ठरवण्यात येणार आहे.