आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या कर्मचा-यांना 13 टक्के पगारवाढ, तिजोरीतून 2 हजार 16 कोटी रुपये जाणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एसटी कर्मचा-यांचा पगार 13 टक्के वाढणार असून यामुळे एसटीच्या तिजोरीवर 2 हजार 16 कोटी रुपये भर पडेल. मात्र उत्पादकतेवर आधारित हा पहिलाच करार असल्याने तिजोरीत 84 कोटी रुपयांची भरही पडणार आहे. चार वर्षांचा हा करार आहे.


एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्याशी गेले काही दिवस विविध संघटना पगारवाढीबाबत चर्चा करीत होत्या. मुख्यमंत्री व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी कर्मचारी संघटनांच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत एसटी कर्मचा-यांना 13 टक्के पगारवाढ देण्यास मान्यता दिली होती. परंतु कामगार संघटनांच्या अन्य मागण्यांमुळे पगारवाढ मिळू शकली नव्हती.

शुक्रवारी युनियनच्या मागण्या मान्य करतानाच दीपक कपूर यांनी उत्पादकता वाढवण्यासाठी कर्मचा-यांनी मदत करावी अशी मागणी केली असता त्याला कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला. एसटीमध्ये एकूण एक लाख 10 हजार कर्मचारी असून त्यापैकी 30 हजार कनिष्ठ कर्मचारी आहेत. या पगारवाढीमुळे कनिष्ठ कर्मचा-यांचा पगार दुप्पट होणार आहे.

एसटीच्या औरंगाबाद, पुणे आणि नागपूर येथे कार्यशाळा आहेत. या ठिकाणी एसटीची निर्मिती केली जाते. एक एसटी तयार करण्यास 1172 तास लागतात. दीपक कपूर यांनी यामध्ये 200 तास कमी केल्याने एसटीचे वर्षाला साडे आठ कोटी रुपये वाचणार आहेत. त्याचप्रमाणे कर्मचा-यांच्या साइनिंग ऑफ पीरियडमधील 15 मिनिटे कमी केल्याने वर्षाला 12 कोटी रुपये वाचणार आहे. हा सर्व पैसा कार्यशाळांच्या आधुनिकीकरणासाठी वापरला जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून दिव्य मराठीला देण्यात आली.


कराराच्या वेळेस दीपक कपूर यांच्यासोबत एसटी कामगार संघटना, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी कामगार कांग्रेस, महाराष्ट्र एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिक युनियन आदि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.