आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर तत्काळ रुजू होण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (शुक्रवार) सलग चौथा दिवस आहे. मुंबईत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन केले आहे. परळ आगारबाहेर कर्मचार्‍यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. दुसरीकडे, हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. उच्चस्तरीय समिती का नेमली नाही? असा सवालही हायकोर्टाचा सरकारला विचारला आहे.

एसटी प्रशासन आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. 
 
अखेर उद्धव ठाकरेंची मध्यस्थी...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्यासाठी अखेर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याची माहिती मिळालीआहे. उद्धव यांनी काल (गुरुवार) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.

संपकरी कर्मचार्‍यांना चक्क अर्धनग्न अवस्थेत बाहेर काढले...
घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहात चक्क अर्धनग्न अवस्थेत बाहेर काढल्याचा प्रकार पंढरपुरात घडला आहे.

चालक- वाहक हे ड्युटीनिमित्त आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेले, पण संपामुळे ते त्या-त्या आगारात अडकून पडले. त्यामुळे त्यांना एसटीच्या विश्रामगृहातच तळ ठोकावा लागला.
परंतु परिवहनचे अधिकारी अचानक विश्रांतीगृहात धडकले आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांना सरळ विश्रांतीगृहाच्या बाहेर हाकलले.

विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या अंगावर कपडेही घालू दिले नाहीत. तसेच या विश्रांतीगृहाला कुलूप लावल्यानं कर्मचाऱ्यांचा सामानही आता अडकून पडला आहे. पंढरपूरप्रमाणे राज्यभरातील सर्वच आगारात शेकड्याने चालक- वाहक अडकून पडले आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था स्थानिक कर्मचारी करीत आहेत. मात्र संपवरील हे कर्मचारी एसटीच्या विश्रांतीगृहाचा वापर मुक्कामासाठी करीत होते. संपावर जायचे असेल तर नियमाप्रमाणे एसटीचे विश्रांतीगृह वापरायचे नाही, असा नियम दाखवत, बाहेरगावच्या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत अर्धनग्न अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

महामंडळाच्या या निर्णयामुळे संपकरी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला असून, इंग्रजांपेक्षा वाईट अवस्था या सरकारने केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

58 हजार फेऱ्या रद्द, 65 लाख प्रवाशांचा खोळंबा
संप चिघळण्यास परिवहनमंत्री रावते जबाबदार आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. संपामुळे एसटीच्या प्रतिदिन 58 हजार फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे 65 लाख प्रवाशांचा खोळंबा होत असून महामंडळाला दैनंदिन 30 कोटींचा फटका बसत आहे. गुरुवारी चर्चेचे कोणतेही निमंत्रण कर्मचारी संघटनांना आले नाही, अशी माहिती संपातील सहभागी संघटनांच्या नेत्यांनी दिली. एकंदर दिवाळी संपेपर्यंत संपावर तोडगा निघेल, अशी तूर्त तरी शक्यता दिसत नाही.

गुरुवारी दिवसभरात
- कल्याण एसटी विश्रामगृहातील पाणी, वीजपुरवठा तोडला.
- साताऱ्यात कामगार सेनेने काही बस रस्त्यावर अाणल्याने सोय.
- नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी खासगी बसवर झाली दगडफेक.
- पंढरपूर आगारात संपकऱ्यांची सामग्री बाहेर फेकली

पुढील स्लाइड्‍सवर वाचा... एसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात....
बातम्या आणखी आहेत...