आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • St Xaviers, Fergusson And Hislop College Get UGC Heritage Tag

मुंबईतील सेंट झेविअर्स, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला UGC कडून \'हेरिटेज\'चा दर्जा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट झेवियर्स कॉलेजची स्थापना 1869 मध्ये करण्यात आली. इंड‌ो-गॉथ‌की शैलीतील बांधकाम असलेली ही वास्तू मुंबईतील देखण्या इमारतींपैकी एक मावली जाते. - Divya Marathi
सेंट झेवियर्स कॉलेजची स्थापना 1869 मध्ये करण्यात आली. इंड‌ो-गॉथ‌की शैलीतील बांधकाम असलेली ही वास्तू मुंबईतील देखण्या इमारतींपैकी एक मावली जाते.
मुंबई- विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी) ने शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा असणारे मुंबईतील चर्चगेट येथील सेंट झेविअर्स, पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेज आणि नागपूरमधील हिसलॉप कॉलेजांना 'स्पेशल हेरिटेजचा दर्जा’ बहाल केला आहे. यूजीसीने देशभरातील 19 कॉलेजना हा गौरव बहाल असून, राज्यातील तीन कॉलेजचा समावेश आहे. आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी यूजीसी या कॉलेजना 5 कोटी रूपयेपर्यंतचा निधी उपलब्ध करून देणार आहे. हा निधी संवर्धन आणि विकास कामासाठीच वापरावा लागेल.

यूजीसीने ‘हेरिटेज’ दर्जा देण्यासाठी देशभरातील ऐतिहासिक परंपरा असणा-या नामांकित कॉलेजांकडून प्रस्ताव मागवले होते. यासाठी देशभरातून 60 प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांमधून यूजीसीने नियुक्त केलेल्या समितीने वेगवेगळ्या निकषांनुसार 19 महाविद्यालयांची निवड केली. यात राज्यातील तीन कॉलेजचा समावेश आहे. मुंबईतील चर्चगेट येथील सेंट झेविअर्स, पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेज आणि नागपूरमधील हिसलॉप कॉलेजचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात सेंट झेविअर्सला 1 कोटी 53 लाख रूपये

‘हेरिटेज’चा दर्जा मिळाल्यामुळे यूजीसीच्या वतीने संवर्धन-विकासासाठी झेविअर्स कॉलेजला 1 कोटी 53 लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून झेविअर्सला नवे डिप्लोमा कोर्स आणि ‘मेंटेनिंग हेरिटेज इन इंडिया’ सर्टिफिकेट कोर्स सुरू करता येणार आहेत. झेविअर्सबरोबरच पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज आणि नागपूरच्या हिसलॉप कॉलेजला 20 लाखांचा निधी मिळाला आहे.
का मिळाजा हेरिटेजचा दर्जा-
मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजची स्थापना 1869 मध्ये करण्यात आली. इंड‌ो-गॉथ‌की शैलीतील बांधकाम असलेली ही वास्तू मुंबईतील देखण्या इमारतींपैकी एक मावली जाते. नागपूरमध्ये रेव्ह. स्टिफन हिस्लॉप यांच्या नावाने ओळखल्या जाणा-या हिस्लॉप कॉलेजची स्थापना 1883 मध्ये झाली तर, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1885 मध्ये झाली. मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांनी कॉलेजच्या उभारणीसाठी 1200 रुपयांची देणगी दिली होती त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सर जेम्स फर्ग्युसन यांचे नाव कॉलेजला दिले होते.
पुढे पाहा, फर्ग्युसन आणि हिसलॉप कॉलेजची इमारत... जी ठरविली गेली हेरिटेज...