आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stampede At Syedna Mohammed Burhanuddin Final Rites

लाखों अनुययांच्या उपस्थितीत धर्मगुरुंचा दफनविधी, अंत्ययात्रेची पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दाऊदी बोहरा समाजाचे 52 वे धर्मगुरु डॉ. सय्यदना मोहम्मद बु-हानुद्दीन यांचा लाखो अनुययाच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. त्याआधी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. जगभरातील 40 देशातून सुमारे दोन ते अडीच लाख त्यांचे अनुयायी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूकीवर मोठा बदल करण्यात आला. मलबार हिल मरिन ड्राईव्ह, सरदार वल्लभभाई पटेल रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला गेला होता. वाळकेश्वर रस्त्याचा वापर न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते.
डॉ. सय्यदना यांची ‘नमाज-ए-जनाजा’ भेंडीबाजारातील सैफिना मशिदीत पार पडला. त्यानंतर तेथील बोहरा समाजाच्या कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.
पुढे पाहा, या अंत्ययात्रेतील क्षण...