मुंबई - स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनला बोचर्या थंडीत सकाळी सुरुवात झाली. सलग 12 वर्षांपासून सुरु असलेल्या या मॅरेथ़ॉनमध्ये मुंबई, महाराष्ट्रासह परदेशातील धावपटू सहभागी झाले आहेत. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीही रस्त्यांवर उतरले आहेत. सिनिअर सिटीझनचा सहभाग देखील लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. मरिन ड्रायव्ह येथे फ्लॅशमॉबने या मॅरेथॉनचा उत्साह वाढिवला.
आशियातील महत्त्वाची मॅरेथॉन असा या स्पर्धेचा लौ
किक आहे. यंदा 40 हजार स्पर्धकांनी नावे नोंदविल्यामुळे स्पर्धा चुरशिची राहिल असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. भारतासह केनिया, इथियोपिया या देशातील खेळाडूंचा या स्पर्धेवर वरचष्मा राहिलेला आहे. यंदाही 41 हजार डॉलरचे (25 लाख रुपये) घसघशीत बक्षीस तेच जिंकतील असा अंदाज आहे.
12 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये सलग 10-12 वर्षांपासून धावणारे स्पर्धक देखील आहेत.धावपटू करणसिंग याला लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला राम सिंग यादवचे आव्हान असणार आहे. गेल्या वर्षी केनियाचा रुटो इव्हान्स तर इथियोपियाची डिनकेश मेकाश मुंबई मॅरेथॉनचे विजेते ठरले होते. यंदाही हजारो डॉलरचे बक्षिस तेच पटकावण्याची शक्यता आहे.
सेलिब्रिटी - राजकारणींची हजेरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे आजीमाजी मंत्री देखील उपस्थित झाले आहेत. माजी मंत्री छगन भुजबळ मॅरेथॉनमध्ये दरवर्षी सहभागी होतात. यंदाही ते सकाळीच हजर झाले आहेत. त्यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, भाजप प्रवक्त्या शायना एन.सी स्पर्धकांचा उत्सह वाढविण्यासाठी उपस्थित आहेत.
LIVE Mumbai Marathon :
- नाशिकची कविता राऊत हाफ मॅरेथॉनची विजेती
- अनिल अंबानींनी पूर्ण केली हाफ मॅरेथॉन
- मरिन ड्राइव्हवर फ्लॅश मॉब
- मुंबई मॅरेथॉनचे 12 वे वर्ष
- 40 हजार स्पर्धकांचा सहभाग
- 40 हजार डॉलरचे बक्षिस
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मॅरेथॉनची छायाचित्रे...