आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stanford Cricket Industries Will Provides Lifetime Cricket Kit To Pranav Dhanawade

विश्वविक्रमी प्रणवला स्टॅनफोर्ड कंपनी पुरवणार आयुष्यभर क्रिकेट किट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
327 चेंडूत नाबाद 1009 धावा ठोकताना प्रणव धनावडेने SF कंपनीची बॅट वापरली होती. - Divya Marathi
327 चेंडूत नाबाद 1009 धावा ठोकताना प्रणव धनावडेने SF कंपनीची बॅट वापरली होती.
मुंबई- कल्याणमधील पंधरा वर्षांच्या मराठमोळ्या प्रणव धनावडेने मंगळवारी 327 चेंडूंत नाबाद 1009 धावा ठोकून क्रिकेटमधील 117 वर्षांचा इतिहास मोडत एक अनोखा विश्वविक्रम नोंदवला. प्रणव दोन दिवस ज्या बॅटने फलंदाजी करीत होता त्यावर ‘एसएफ’असे लिहले होते. ‘एसएफ’ याचा अर्थ स्टॅनफोर्ड क्रिकेट इंडस्ट्रीज. क्रिकेटला लागणारे बॅट, बॉल, ग्लोव्हज, पॅड इत्यादी साहित्य पुरवणारी यूपीतील मेरठमधील ही प्रसिद्ध कंपनी. प्रणव याने जागतिक क्रिकेटमधला हजार धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर या कंपनीच्या मालकाने त्याला आयुष्यभर क्रिकेट किट देणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईत दुसरा सचिन तयार होतोय अशा शब्दांत हरभजनसिंगने प्रणवचे कौतूक केले आहे.
प्रणव धनावडेने वायलेनगर येथील युनियन क्रिकेट ग्राऊंडवर जागतिक क्रिकेटमध्ये विक्रमाचे नवे शिखर गाठले. क्रिकेटच्या इतिहासात एका डावात चार आकडी धावसंख्या करण्याचा चमत्कार त्याने करून दाखवला. प्रणवने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील आंतरशालेय एच. टी. भंडारी क्रिकेट स्पर्धेत के. सी. गांधी शाळेसाठी खेळताना हा विश्‍वविक्रम साकारला. तब्बल 6 तास 36 मिनिटे खेळपट्टीवर उभे राहताना त्याने 59 सणसणीत षटकार व 129 दमदार चौकारांची आतषबाजी केली. प्रणवने आर्य गुरुकुल शाळेविरुद्ध ही ऐतिहासिक खेळी केली. के. सी. शाळेने तीन बाद 1465 धावांवर डाव सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी हाही एक विक्रमच ठरला.
प्रणवच्या 1009 धावांच्या देदीप्यमान खेळीच्या जोरावर के. सी. गांधी शाळेने आर्य गुरुकुल संघावर एक डाव व 1362 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात 31 धावांवर गारद झालेला आर्य गुरुकुलच्या संघाला दुसर्‍या डावातही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 52 धावांवरच त्यांचा दुसरा डाव संपला.
प्रणववर कौतूकांचा व बक्षिसांचा वर्षाव-
प्रणव याने जागतिक क्रिकेटमधला नवा विश्‍वविक्रम केल्यानंतर यापुढचा शिक्षण व प्रशिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. प्रणवने क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी क्रीडा खात्याकडून मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण—डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने प्रणव या विश्‍वविक्रमवीराचा ‘नागरी सन्मान’ करण्यात येणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मंगळवारीच दिली आहे. शिवसेनेकडून प्रणवला 1 लाख रूपये देण्यात येणार आहे. ठाणे मनसेच्या वतीने राजू पाटील यांच्याकडून प्रणवचा जाहीर सत्कार करून 109000 रूपये बक्षिस दिले जाणार आहे. एमसीए पण त्याला मदत करण्याचा विचार करीत आहे.
पुढे पाहा व वाचा, SF कंपनीबाबत...